Asani Cyclone: 'असानी' चक्रीवादळ पुढील 24 तासात तीव्र, ओडिशा आणि बंगालमध्ये सतर्कतेचा इशारा, ममता बॅनर्जींच्या दौरा कार्यक्रमात बदल

'असानी' चक्रीवादळाची तीव्रता आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तीव्र चक्री वादळात (cyclone) आली आहे. अशा स्थितीत पुढचे २४ तास खूप धोक्याचे असणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी ही माहिती दिली. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून ९४० किमी आणि ओडिशातील पुरीपासून १ हजार किमी अंतरावर असल्याचे समजते आहे.

 Asani Cyclone: ​​Hurricane Asani intensifies in next 24 hours
Asani Cyclone: 'असानी' चक्रीवादळ पुढील 24 तासात तीव्र  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी ओडिशाच्या गजपती, गंजम आणि पुरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • हे चक्रीवादळ बुधवारी तीव्र चक्री वादळात रूपांतरित होण्याची आणि गुरुवारपर्यंत खोल दाबामध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोलकाता/भुवनेश्वर: 'असानी' चक्रीवादळाची तीव्रता आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तीव्र चक्री वादळात (cyclone) आली आहे. अशा स्थितीत पुढचे २४ तास खूप धोक्याचे असणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी ही माहिती दिली. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून ९४० किमी आणि ओडिशातील पुरीपासून १ हजार किमी अंतरावर असल्याचे समजते आहे. चक्रीवादळ १० मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये 'हाय अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे. 

दरम्यान, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ तीव्र होत वायव्य दिशेला सरकला आणि रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर मध्यवर्ती झाले आहे. हवामान खात्याने सांगितले की, मंगळवारी म्हणजेच 10 मे रोजी उत्तर आंध्र-ओडिशा किनार्‍यावरून 'असानी' पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचेल आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम बंगालकडे वळेल. 

ओडिशात अलर्ट जारी

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (SRC) पीके जेना म्हणाले की, राज्य सरकारने बचाव कार्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. ते म्हणाले, "आम्हाला राज्यात कोणताही मोठा धोका दिसत नाही कारण ते पुरीजवळील किनार्‍यापासून सुमारे 100 किमी अंतरावर जाणार आहे." तथापि, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दल (ODRAF) आणि अग्निशमन सेवा यांच्या बचाव पथके कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.

वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता

IMD ने सांगितले की, मंगळवारपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या किनारी जिल्ह्यांसह राज्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 10 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात तसेच ओडिशा किनारपट्टीवर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या समुद्राच्या स्थितीत 9 मे आणि 10 मे रोजी बदल दिसून येतील. दरम्यान, 10 मे रोजी समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफची टीम तैनात

बालासोरमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असून एक ओडीआरएएफ टीम गंजम जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. पुरी जिल्ह्यातील कृष्णा प्रसाद, सातपारा, पुरी आणि अस्तरंग ब्लॉक आणि केंद्रपारा मधील जगतसिंगपूर, महाकालपाडा आणि राजनगर आणि भद्रक येथेही ODRAF टीम तयार आहेत  जेना म्हणाले की, सर्व जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भुवनेश्वर हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास म्हणाले, "चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मंगळवारी संध्याकाळपासून किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाशी संबंधित क्रियाकलाप सुरू होतील."

ममता बॅनर्जींनी आपला दौरा पुढे ढकलला

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे. टीएमसीचे (तृणमूल काँग्रेस) सरचिटणीस कुणाल घोष यांनी सांगितले की, 'असनी' वादळाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 3 दिवसांचा कार्यक्रम 10, 11 आणि 12 मे ते 17, 18 आणि 19 मे पर्यंत बदलण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी