Asaram Bapu Convicted: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; सत्र न्यायालय आज सुनावणार शिक्षा

Asaram Bapu Convicted in marathi: गांधीनगर (Gandhinagar) सत्र न्यायालयाने (Sessions Court)आसाराम बापूला (Asaram Bapu) 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी (rape case) दोषी ठरवलं आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.

Asaram Bapu Convicted in Rape Case;  today sessions court will pronounce sentence
आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सत्र न्यायाधीश डी. के. सोनी यांनी या प्रकरणातील निर्णय सोमवारी राखून ठेवला.
  • गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं
  • आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.

Asaram Bapu Convicted in marathi: गांधीनगर : गुजरातमधील (Gujarat)गांधीनगर (Gandhinagar)येथील सत्र न्यायालयाने (Sessions Court)स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू (spiritual guru)आसाराम बापूला (Asaram Bapu)बलात्कारप्रकरणी (rape case)दोषी ठरवलं आहे.  महिला अनुयायीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर होता. गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.  या प्रकरणात सत्र न्यायालय आज मंगळवारी शिक्षा सुनावणार आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.  या प्रकरणात सत्र न्यायालय आज मंगळवारी शिक्षा सुनावणार आहे. सध्या आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहेत.   (Asaram Bapu Convicted in Rape Case;  today sessions court will pronounce sentence )

अधिक वाचा  : रेल्वे स्थानकावर coupleचा सुटला कंट्रोल;किसिंग Video Viral

सत्र न्यायाधीश डी. के. सोनी यांनी या प्रकरणातील निर्णय सोमवारी राखून ठेवला.  दरम्यान न्यायालयाने पुराव्याअभावी आसारामच्या पत्नीसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बलात्काराच्या आरोपात आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही आरोपी करण्यात आलं होतं. पण गांधीनगर न्यायालयाने संबंधित सर्वांना निर्दोष मुक्त केलं.  

अधिक वाचा  :बायको हरविल्याची तक्रार करायला गेला आणि अडकला

दरम्यान, 20013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. चंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’नुसार आसाराम बापूने सन 2001 ते 2006 या कालावधीत आश्रमातील एका शिष्येवर अनेकवेळा बलात्कार केला. तक्रारीनुसार, या बहिणीमधील लहान बहिणीने तक्रारीत म्हटलं  की, सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना नारायण साईने  तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.

अधिक वाचा  : सूर्यकुमार यादव Player of the match झालाचं कसा

विशेष सरकारी वकील आर. सी. कोदेकर यांच्या माहितीनुसार, न्यायालयाने आसारामला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 2(सी) (बलात्कार), 377 (अनैसर्गिक गुन्हे) आणि इतर तरतुदींनुसार दोषी ठरवले आहे. आणखी एका बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात आली. 2018 मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी