Tulip Garden : आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन या दिवसापासून पर्यटकांसाठी खुले होणार

Asia's largest tulip garden in Srinagar is all set to open on March 19 : आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन रविवार 19 मार्च 2023 पासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

Tulip Garden
आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन
  • ट्युलिप गार्डन रविवार 19 मार्च 2023 पासून पर्यटकांसाठी खुले होणार
  • जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आहे ट्युलिप गार्डन

Asia's largest tulip garden in Srinagar is all set to open on March 19 : आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन रविवार 19 मार्च 2023 पासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. हे ट्युलिप गार्डन जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आहे. श्रीनगरच्या ट्युलिप गार्डनमध्ये 68 प्रजातींची 16 लाखांपेक्षा जास्त फुलझाडे आहेत. 

दल लेक (Dal Lake) आणि झबरवान टेकडीच्या पायथ्याशी असलेले आशियातले सर्वात मोठे ट्युलिप गार्डन ही श्रीनगरमधील दोन ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत या दोन्ही ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

जम्मू काश्मीर सरकारने यंदा एप्रिल 2023 मध्ये आशियातल्या सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिप उत्सवाचे आयोजन केले आहे. ट्युलिप उत्सवाच्या निमित्ताने पर्यटकांना फुलांच्या जगात फिरण्याचा एक अविस्मरणीय अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 

प्रशासनाने ट्युलिप गार्डनमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गाला तीन हजार फुलझाडांनी सजवले आहे. या मार्गावर पर्यटकांचे फुलांद्वारे स्वागत केले जाईल. ट्युलिप गार्डनमध्ये फुलांची निगा राखण्यासाठी 500 जणांचा ताफा कार्यरत आहे. अनुभवी माळी फुलांची निगा राखत आहेत. 

ट्युलिप गार्डनचे उद्घाटन 2008 मध्ये जम्मू काश्मीरचे त्यावेळचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केले होते. उद्घाटन केल्यापासून दरवर्षी हे उद्यान उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीनिशी सज्ज असते. कोरोना काळात उद्यानाच्या कारभारावर परिणाम झाला होता. पण आता परिस्थिती सावरली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद नियंत्रणात आहे. कलम 370 आणि 35 अ हटविण्याच्या निर्णयाचे नागरिकांनी  स्वागत केले आहे. राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. जम्मू काश्मीरने पर्यटक संख्येच्या बाबतीत नवा उच्चांक स्थापन केला आहे. या उत्साहवर्धक वातावरणात टयुलिप गार्डन खुले होत आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

समोसा विकून नशीब घडवलं

या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी