आसाममध्ये पुरामुळे ११ दिवसांत १५९ मृत्यू

Assam Floods Situation critical in Silchar after 8 people died in last 24 hours figure increased to 159 : आसामच्या अनेक भागांमध्ये नदीकाठ ओलांडून नागरी वस्तीत शिरलेले पुराचे पाणी ११ दिवस उलटले तरी ओसरलेले नाही. पुरामुळे ११ दिवसांत १५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Assam Floods Situation critical in Silchar after 8 people died in last 24 hours figure increased to 159
आसाममध्ये पुरामुळे ११ दिवसांत १५९ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आसाममध्ये पुरामुळे ११ दिवसांत १५९ मृत्यू
  • आसाममधील पूरबळींची संख्या २४ तासांपूर्वी १५१ होती
  • मागील २४ तासांत आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळे ८ जणांचा मृत्यू

Assam Floods Situation critical in Silchar after 8 people died in last 24 hours figure increased to 159 : आसामच्या अनेक भागांमध्ये नदीकाठ ओलांडून नागरी वस्तीत शिरलेले पुराचे पाणी ११ दिवस उलटले तरी ओसरलेले नाही. पुरामुळे ११ दिवसांत १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आसाममधील पूरबळींची संख्या २४ तासांपूर्वी १५१ होती. पण मागील २४ तासांत आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाला. नागांव, लखीमपुर, बारपेटा, विश्वनाथ, धेमाजी, मोरीगांव या सहा जिल्ह्यांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत आसामच्या आठ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. राज्यातील सुमारे ३० लाख नागरिक बेघर झाले आहेत. पुराचा तडाखा बसलेल्या भागातून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी सरकारी यंत्रणेने उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतर करण्यात आले आहे. 

ब्रह्मपुत्र, बेकी, कोपिली, बराक, कुशियारा या नद्यांना पूर आला आहे. या सर्व नद्यांनी पूररेषा ओलांडून एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पुराचे पाणी वेगाने ओसरत नसल्यामुळे आसाम सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती आसाममध्ये गुरुवारी पोहोचली आहे. समिती परिस्थितीचा आढावा घेत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गुरुवार ३० जून २०२२ रोजी राज्याील पूरस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा घेतला. आवश्यक त्या सूचना प्रशासनास दिल्या. तातडीची मदत म्हणून पुराचा तडाखा बसलेल्या प्रत्येक कुटुंबाला ३८०० रुपयांची मदत आणि मानतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

प्रशासन १५ जुलै पर्यंत पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेऊन एक अहवा सरकारला सादर करणार आहे. आसाम सरकारने पुराचा तडाखा बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सिलचरमध्ये पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये वीज, पाणी, अन्न, औषधे यांची टंचाई निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली असल्यामुळे रस्ते मार्गाने मदत पाठवणे कठीण झाले आहे. बेथुकुंडी येथे तुटलेला बांध दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. 

आसाम सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुराचा राज्यातील २६०८ गावांना तडाखा बसला. कछार जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. आसामच्या कछार जिल्हयात पुरामुळे १४ लाख ३१ हजार ६५२ जणांचे जीवन विस्कळीत झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी