प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन झालं आहे. बेजान दारूवाला यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

astrologer bejan daruwala passes away gujarat
प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन  

थोडं पण कामाचं

  • प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन
  • वयाच्या ९०व्या वर्षी निधन
  • अहमदाबाद येथील रुग्णालयात बेजान दारूवाला यांच्यावर सुरू होते उपचार

मुंबई: प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं निधन झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी बेजान दारूवाला यांच्या निधनाबाबतचं ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बेजान दारूवाला यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेजान दारूवाला यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचंही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र, त्यांचा मुलगा नास्तूर दारूवाला याने बेजान दारूवाला यांना कोरोना झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. 
 

गुजरातमध्ये झाला होता जन्म 

बेजान दारूवाला यांचा जन्म ११ जुलै १९३१ रोजी अहमदाबाद येथे एका पारशी परिवारात झाला होता. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत होते. बेजान दारूवाला यांचं प्राथमिक शिक्षण हे अहमदाबादमध्येच पूर्ण झालं आणि त्यानंतर ते प्रोफेसर बनले होते. देशातील अनेक टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेले भविष्य प्रसारित होत होते.

मोदींच्या विजयाची भविष्यवाणी 

बेजान दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी ज्योतिष वेबसाइटचा शुभारंभ मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जोतिषी सेवेची सुरूवात त्यांनी आपल्या वेबसाईटवरुन केली. त्यांच्या वेबसाइटचं नाव बेजानदारूवालाडॉटकॉम असं आहे. बेजान दारूवाला यांनी संजय गांधी यांचं निधन आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत भविष्यवाणी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी