सासऱ्याने सुनेला तीन जणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, मध्यरात्री भर गावात मोठा ड्रामा 

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या सुनेला तीन तरुणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडले.

Awaid_Sambadh
सासऱ्याने सुनेला तीन जणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली.
  • सासऱ्याने सुनेला तीन तरुणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
  • तीनही आरोपींना ग्रामस्थांनी केली बेदम मारहाण

गोरखपूर: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने तीन जणांना आपल्या सुनेच्या खोलीतून आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री एक व्यक्ती आपल्या घरात झोपलेला असताना त्याच्या सुनेच्या खोलीतून काही तरी घडत असल्याचं त्याला जाणवलं. त्यामुळे सासऱ्याला शंका आल्याने त्याने आजूबाजूच्या लोकांना एकत्र केलं. त्यानंतर त्याने सुनेच्या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा समोर जे काही दिसलं त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण त्या व्यक्तीची सून ही तिघा तरुणांसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. 

ग्रामस्थांनी केली मारहाण 

यानंतर ग्रामस्थांनी तिन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली आणि मग पोलिसांना बोलावून तिघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी युवकाकडून यावेळी चाकूही जप्त केला आहे. यावेळी सासरच्यांनी सुनेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आणि युवकासोबत तिचे अवैध संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सध्या संपूर्ण गावात जोरदार चर्चा सुरु आहे. 

तीन तरुणांशी सुनेचे होते अनैतिक संबंध

अमर उजालाच्या वृत्तानुसार, सासरच्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे की, जवळच्या खेड्यातील युवकाशी त्यांच्या सुनेचे अनैतिक संबंध होते. तसेच एक तरुण घरात शिरुन तिच्या सासऱ्याला देखील धमकी द्यायचा. 

जेव्हा गावकऱ्यांनी तिन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले , त्यावेळी एका तरूणाने चाकूने हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण मोठ्या संख्येने जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर चिडलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. सध्या पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी