Gorakhnath Mandir News | नवी दिल्ली : गोरखपूरच्या गोरखनात मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ला झाल्यानंतर एटीएसनेही रात्री उशिरा तपासास सुरूवात केली. एटीएस आणि पोलिसांचे पथक आरोपी अहमद मुर्तझा अब्बासीच्या घरी पोहचले आणि आरोपीचे वडील आणि इतर कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. एटीएस त्याच्या विदेशी कनेक्शनचा देखील शोध घेत आहे. आरोपीकडे पासपोर्ट होता की नाही याचा तपास करत आहे. (Attack on Gorakhnath temple, ATS investigation underway).
अधिक वाचा : ग्रॅमी पुरस्कारासाठी युक्रेनच्या राष्ट्रपतींची हजेरी
तसेच आरोपी परदेशात गेला आहे की नाही? यासोबतच त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपचा आयपी पत्ता परदेशी लोकांशी झालेले संभाषण किंवा फंडिंग इत्यादींचाही तपास सुरू आहे. आरोपींनी मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये कोणते ॲप वापरले आहे याचा देखील तपास सुरू आहे. लक्षणीय बाब म्हणजे या घटनेची माहिती एनआयएला देखील देण्यात आली आहे.
या घटनेमध्ये दहशतवादी कनेक्शन होते की याच्या माध्यमातून दंगली घडवण्याचा कट होता याबाबत शंका निर्माण झाली आहे. या ठिकाणी एटीएसने तपास सुरू केला आहे. याआधीही गोरखपूरमध्ये सीरियल ब्लास्ट घेऊन दहशतवादी संघटना आल्या आहेत, त्यामुळे एटीएसने या विषयाला गांभीर्याने घेत आहे. पोलिसांचे सूत्र सांगतात की, मुख्यमंत्री अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख करत असतात आणि एकाही दंगलीचा उल्लेख करत नाहीत. त्यामुळे दंगलीच्या कटाच्या मुद्द्यावर अधिक तपास केला जात आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा मोठा कट होता का याचाही तपास पोलिस आणि अन्य यंत्रणा करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या दिवशी चौरीचोरा पोलिस स्टेशन परिसरात दंगल घडवण्याचा कट रचण्यात आला होता. सध्या एटीएस, पोलिस आणि एलआययू प्रत्येकी एका मुद्याचा तपास करित आहेत.