हातात कुराण आणि चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला होता हल्लेखोर

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 30, 2020 | 11:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

फ्रान्सच्या नीस शहरात गुरुवारी एका चर्चमध्ये हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. २० वर्षीय हा हल्लेखोर ट्यूनिशियाचा नागरिक आहे.

France church attack
Nice attack: हातात कुराण घेऊन चर्चमध्ये घुसला होता हल्लेखोर, इटलीच्या मार्गावर झाला होता इटलीत दाखल 

थोडं पण कामाचं

  • फ्रान्सच्या नीस शहरात हल्ल्याच्या तपासात झाला खुलासा
  • इटलीमार्गे फ्रान्समध्ये दाखल झाला होता ट्यूनिशियाचा हल्लेखोर
  • सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या हल्लेखोराच्या अनेक हालचाली

नीस (फ्रान्स): फ्रान्सच्या (France) नीस (Nice) शहरातील चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत (attack on church) एक मोठा खुलासा झाला आहे. हल्ला करणारा इसम फक्त २० वर्षांचा (20 years old attacker) आहे आणि ट्यूनिशियाचा रहिवासी (resident of Tunisia) आहे. फ्रान्सच्या आतंकवादी विरोधी यंत्रणेने (anti-terrorist agency) दिलेल्या माहितीनुसार त्याचा जन्म १९९९ सालचा आहे. हल्लेखोर हा फ्रान्सला पोहोचण्याआधी लॅम्पदूसाच्या (Lampedusa) इतालावी बेटावर गेला जे उत्तर आफ्रिकेतून (North Africa) जहाजातून येणाऱ्या प्रवाशांचे मुख्य स्थान आहे. हल्लेखोराने २० सप्टेंबर रोजी इटलीच्या एका बंदरातून शहराची यात्रा केली आणि इथून फ्रान्समध्ये (entered France) दाखल झाला.

कुराण आणि चाकू घेऊन चर्चमध्ये झाला होता दाखल

तपासादरम्यान ही गोष्टही समोर आली आहे आरोपी इसम हातात कुराण आणि चाकू घेऊन चर्चमध्ये दाखल झाला होता. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की हा इसम सकाळी ६:४७ वाजता नीस रेल्वेस्थानकात प्रवेश करत आहे. इथे आपले बूट बदलून चर्चमध्ये जाण्याआधी त्याने आपला कोट आत घातला. इथून चर्च फक्त ४०० मीटरच्या अंतरावर आहे. तपासयंत्रणांनी सांगितले आहे की हल्लेखोर हा इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण आणि दोन टेलिफोन घेऊन जात होता. हल्ल्यात वापरण्यात आलेला १७ सेंटीमीटरचे ब्लेड असलेला एक चाकू त्याच्याकडे सापडला होता. याशिवाय एक बॅगही मिळाली होती ज्यात २ आणखी चाकू होते जे वापरण्यात आलेले नव्हते.

हल्लेखोराने दिल्या होत्या धार्मिक घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चमध्ये पोलिसांनी प्रवेश करण्याआधी हल्लेखराने चर्चमध्ये साधारण ३० मिनिटे घालवली होती आणि एका गल्लीत पुढे गेल्यानंतर पोलीस आणि हल्लेखोर आमनेसामने आले. यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा धार्मिक घोषणा देत होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सुरुवातीला एक इलेक्ट्रॉनिक बंदूक वापरली आणि नंतर आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढली.

तीन लोकांचा झाला मृत्यू

या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांचा मृत्यू चर्चमध्येच झाला तर गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीने तिथून पळ काढताना प्राण सोडले. फ्रान्सच्या संसदेच्या खालील सदनाने कोरोना व्हायरसमुळे नवे निर्बंध लावण्यावर चाललेली चर्चा स्थगित करून पीडितांसाठी काही वेळ मौन पाळले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी