Aurangzeb Birthday: म्हणून औरंगजेबची कबर महाराष्ट्रात आहे, जाणून घ्या या मागील कारण

Aurangzeb Birthday:  आज 3 नोव्हेंबर मुघल बादशहा औंरगजेबचा जन्मदिन आहे. दिल्लीचा बादशहा असलेला औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी दख्खनमध्ये आला परंतु याच मराठीत मातीत औरंगजेबाची कबर खणली गेली. मुघल राजघरण्यातील अनेक सदस्यांच्या कबरी या दिल्लीत आहेत. परंतु औरंगजेबला महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये दफन करण्यात आले. त्याच्या मागेही एक कारण आहे. जाणून घेऊया औरंगजेबची कबर महाराष्ट्रात का आहे.

aurangzeb  tomb auarangabad
म्हणून औरंगजेबची कबर महाराष्ट्रात आहे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उद्या 4 नोव्हेंबर मुघल बादशहा औंरगजेबचा जन्मदिन आहे.
  • औरंगजेबला महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये दफन करण्यात आले.
  • जाणून घेऊया औरंगजेबची कबर महाराष्ट्रात का आहे.

Aurangzeb Birthday:  आज 3 नोव्हेंबर मुघल बादशहा औंरगजेबचा जन्मदिन आहे. दिल्लीचा बादशहा असलेला औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी दख्खनमध्ये आला परंतु याच मराठीत मातीत औरंगजेबाची कबर खणली गेली. त्याच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य आणखी पुढे गेले. नंतर मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. मुघल राजघरण्यातील अनेक सदस्यांच्या कबरी या दिल्लीत आहेत. परंतु औरंगजेबला महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये दफन करण्यात आले. त्याच्या मागेही एक कारण आहे. जाणून घेऊया औरंगजेबची कबर महाराष्ट्रात का आहे. 

अधिक वाचा : तुम्हीही ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश करत असाल तर सावधान, महिलेला आला स्ट्रोक

औरंगजेब 1658 साली सत्तेवर आला. सत्तेवर येण्यापूर्वी त्याने आधी आपल्या सख्ख्या भावांचा खून केला आणि आपल्या बापालाच म्हणजेच शहाजहानला नजरकैदेत टाकले होते. औरंगजेबाने 1658 ते 1707 या 49 वर्षांपर्यंत दीर्घ काळ राज्य केले.  


औरंगाबाद राजधानी

पूर्वी औरंगाबाद शहराचे नाव फतेहपूर होते, जेव्हा औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मोगलांनी इथे आक्रमण केले तेव्हा औरंगजेबने या शहराला राजधानी घोषित केले आणि स्वतःच्या नावावरून या शहराचे नामकरण औरंगाबाद केले. औरंगजेबने सुरूवातीचा बराच काळ या शहरात घालवला, म्हणून औरंगजेबला या शहराबद्दल विशेष प्रेम होते. 

अधिक वाचा : CAA अंतर्गत अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणार भारताचे नागरिकत्व

औरंगजेबाची कबर

1707 साली वृद्धापकाळाने औरंगजेबाचे निधन झाले. तेव्हा औरंगाबादच्या खुल्दाबाद शहरात औरंगजेबला दफन करण्यात आले. तिथेच औरंगजेब मकबरा बनवण्यात आले. त्याच्या मृत्यूपश्चात पुत्र आजम शाहने हा मकबरा बनवला. औरंगजेबाची ही कबर अतिशय साधी आहे. मकबरेवर एक सफेद चादर असून त्यावर एक सब्जाचे झाड लावण्यात आले आहे. शेख शुकुर हे या मकबर्‍याची देखभाल करतात. शुकुर यांची पाचवी पिढी या मकबर्‍याची देखभाल करत आहे. 

अधिक वाचा : Sardar Patel Birth Anniversary : भारताशी विलग होऊन पाकिस्तानचे भले होणार नाही, सरदार पटेल यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी

खुद्द औरंगजेबाने आपल्या मृत्यूपूर्वी आपली कबर कशी असावी हे लिहून ठेवले होते. आपली कबर अतिशय साधी असावी असे औरंगजेबने म्हटले होते. आपल्या कबरीवर सब्जाचे झाड लावण्यात यावे, त्यावर कुठल्याही प्रकारची छत नसावी असे औरंगजेबाने म्हटले आहे. औरंगजेबाच्या मकबर्‍याजवळील एक दगड आहे, त्यावर औरंगजेबाचे संपूर्ण नाव अब्दुल मुज़फ़्फ़र मुहीउद्दीन औरंगज़ेब आलमगीर असे कोरण्यात आले आहे. त्याशिवाय औरंगजेबाच्या जन्माची आणि मृत्यूची तारीखही नमूद करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : भारतातील या राज्यात जगातील सर्वात मोठी शंकराची मूर्ती

औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात आपल्याला औरंगाबादमध्येच दफन करण्यात यावे असे लिहून ठेवले होते. इथे औरंगजेबाच गुरू सुफी संत सैय्यद जैनुद्दीनची कबर आहे. आपल्या गुरूच्या शेजारीच आपल्याला दफन करण्यात यावे असे औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात म्हटले होते. औरंगजेब ख्वाजा सैय्यद जैनुद्दीन सिराजचा अनुयायी होता.  सैय्यद जैनुद्दीन सिराज यांना खुल्दाबादमध्ये दफन करण्यात आले होते. याच भागात अनेक सुफी संतांना दफन करण्यात आले होते. खुल्दाबाद हे तेव्हा सुफी संत आणि इस्लामी संताचे केंद्रस्थान होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी