Aurangzeb Birthday: हिराबाईच्या प्रेमात होता औरंगजेब, जाणून घ्या मुघल सम्राटचे विवादित किस्से

 इतिहासातील सर्वात कठोर शासक म्हणून औरंगजेबला ओळखलं जातं, परंतु हा सम्राट देखील पहिल्या नजरेतील प्रेमाचा बळी ठरला. 1636 मध्ये जेव्हा औरंगजेब हा मुघल राजपुत्र होता आणि त्याला दख्खनचा राज्यपाल म्हणून बुरहानपूरला पाठवण्यात आले होते.

Aurangzeb was in love with Hirabai
Aurangzeb Birthday: हिराबाईच्या प्रेमात होता औरंगजेब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • औरंगजेब बुरहानपूरच्या एका हिंदू महिलेच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता.
  • औरंगजेब हिंदूंवर जिझिया कर लादण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.
  • 1679 ते 1707 या काळात मुघल प्रशासनातील हिंदू अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती.

 Aurangzeb Birthday : मुंबई :  आपल्या इतिहासातील (history क्रूर राजांमध्ये औरंगजेबाचे नाव नेहमी स्मरणात ठेवले जाते.  संपूर्ण भारतावर मुघल साम्राज्य (Mughal Empire) करण्याचे स्वप्न औरंगजेब पाहत होता. परंतु हे स्वप्नही त्यांच्या मृत्यूने संपुष्टात आले.  या दुष्ट शासक राजाचे नाव जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा भारतीय राजकारणात वाद उपस्थित होत असतात. औरंगजेबाने भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं राज्य केले. औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड व्यापला होता.  (Aurangzeb was in love with Hirabai, know the controversial stories of Mughal Emperor)

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

औरंगजेबच्या जीवनातील किस्से 

समाजातील एक घटक औरंगजेब एक शक्तिशाली मुघल शासक म्हणून स्मरण करतो, तर दुसरा वर्ग त्याच्यावर कट्टर आणि कट्टर शासक म्हणून टीका करत असतो.  अख्या हिंदुस्तानावर राज्य करण्याची हव्यास ठेवणारा औरंगजेब बुरहानपूरच्या एका हिंदू महिलेच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता.  आज आपण त्याच्या प्रेम कहाणी आणि काही किस्से जाणून घेणार आहोत. औरंगजेब हिंदूंवर जिझिया कर लादण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. जिझिया हा गैर मुस्लिमांवर लादलेला कर होता.  परंतु औरंगजेबाने गरीब हिंदू आणि राजपूतांना जिझिया करातून सूट दिली होती.

अधिक वाचा  : अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

औरंगजेबला हिंदू विरोधी म्हटलं जातं. त्याने हिंदूच्या मंदिराची तोडफोड केली असं म्हटलं जातं परंतु काही त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या एका पत्रातून मात्र तो मंदिर विरोधी नसल्याचं सांगितलं जातं. इतिहासकार इरफान हबीब औरंगजेबाचा एक किस्सा सांगतात, 'औरंगजेबाने एकदा आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, जर तुम्ही एलोरातून गेलात तर तुम्हाला तिथल्या मूर्ती पाहायलाच हव्यात. औरंगजेबाने त्याला 'मझारे इलाही' म्हणजेच दैवी आश्चर्य म्हटले. म्हणजेच तो मूर्तींच्या विरोधात नव्हता. तसेच ऑडरी ट्रस्चके यांच्या मते, औरंगजेबाच्या काळात हिंदूंचा नरसंहार झाला, अशी कोणतीही घटना नोंद झालेली नाही. 

अधिक वाचा  : Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी

या उलट त्याच्या काळात हिंदूंची नेमणूक महत्त्वाच्या पदांवर झाली होती. औरंगजेबाच्या मुघल कारकिर्दीत, नोकरशाहीत त्याच्या पूर्ववर्तींच्या कारभारापेक्षा जास्त हिंदू कार्यरत होते. 1679 ते 1707 या काळात मुघल प्रशासनातील हिंदू अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. परंतु काही कागदपत्रानुसार, औरंगजेबने उच्च पदावरील हिंदू सैनिकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित केलं होतं. हिंदू आणि शीखांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी औरंगजेब भारतात कुप्रसिद्ध आहे. शिखांचे 9वे गुरू गुरु तेग बहादूर यांनी काश्मिरी ब्राह्मणांना मदत केली तेव्हा त्याने  तेग बहादूरची हत्या केली होती.

औरंगजेबाचा भाऊ मुराद बक्श याने त्याला सत्ता मिळवण्यासाठी मदत केली होती, पण सत्तेवर आल्यानंतर औरंगजेबाने मुराद बक्शलाही मारले. औरंगजेबाला जेवणाची खूप आवड होती. मोठ्या साम्राज्याचा शासक बनल्यानंतर औरंगजेबाने मांसाहार करणे सुरू केले. ताजी फळे खूप आवडायची आणि आंब्याची खूप आवड होती.औरंगजेबाच्या क्रूरतेची एक कहाणी अशी आहे की, सत्ता मिळवण्यासाठी त्याने आपले भाऊ दारा शिकोह आणि शाह शुजा यांनाही ठार मारले आणि वडील शाहजहानलाही कैद केले होते.

अशी होती प्रेम कहाणी 

औरंगजेबाला संगीत आणि सौंदर्याचा तिरस्कार होता, पण 1636 मध्ये औरंगजेब दख्खनचा गव्हर्नर म्हणून बुर्‍हाणपूरला गेला तेव्हा तिथे हिराबाईंची भेट झाली.  औरंगजेब हिराबाईच्या प्रेमात पडला होता.  बादशाह शाहजहानचा मेहुणा आणि खानदेशचा शासक सैफखान याच्या राजवाड्यात औरंगजेबाने हिराबाईला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो बेशुद्ध झाला होता. बेशुद्ध झाल्यानंतर तो खाली पडलास नंतर शुद्धीवर आल्यावर त्याने पाहिलं तर त्याचे डोके हिराबाईच्या मांडीत होते. त्यानंतर तो तिच्या दाट डोक्याच्या केसांमध्ये गुंतून गेला.
 
 इतिहासातील सर्वात कठोर शासक म्हणून औरंगजेबला ओळखलं जातं, परंतु हा सम्राट देखील पहिल्या नजरेतील प्रेमाचा बळी ठरला. 1636 मध्ये जेव्हा औरंगजेब हा मुघल राजपुत्र होता आणि त्याला दख्खनचा राज्यपाल म्हणून बुरहानपूरला पाठवण्यात आले होते. येथील एका खोलीत हिराबाई जन्मली होती.  दरम्यान हिराबाईच्या प्रेमात पडलेल्या औरंगजेबाने तिचे नाव बेगम झैनाबादी महल ठेवले होते. अनाथ असलेल्या हिराबाईचे पालनपोषण तिची मावशी अख्तरीबाईंनी केले.

हिराबाईचे तिचे चाहते राजापासून भिकाऱ्यांपर्यंत होते, तिचं संगीत आणि तिच्या सौंदर्याचे सर्वजण वेडे होते.  औरंगजेब आणि हिराबाई यांच्या प्रेमकथेचा उल्लेख तत्कालीन पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये हमीदुद्दीन खान नीमचा यांनी 1640 मध्ये लिहिलेले औरंगजेबाचे चरित्र 'एहकाम-ए औरंगजेब', 18व्या शतकातील नवाज शम्स-उद-दौला शाह नवाज खान आणि त्याचा मुलगा आणि इटालियन यांनी लिहिलेले 'मासिर अल-उमरा' यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी