भारतासोबत करार झाल्यानं स्कॉट मॉरिसनचा आनंद गगनाला; आनंदात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बनवली खिचडी

ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान (Prime Minister) स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) हे सुद्धा भारतीय पदार्थांचे चाहते आहेत. भारतासोबत व्यापारिक करार यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी स्वत: स्वयंपाक घरात जात खिचडी बनवली आहे. 

Australian Prime Minister Scott Morrison cooked Khichdi
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बनवली खिचडी   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • भारतासोबत नवीन व्यापार करार झाल्यानंतर खिचडी बनवून स्कॉट मॅरिसन यांनी आनंद साजरा केला.
  • भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कॅनबेरा: भारतीय संस्कृती (Indian culture) आणि भारतीय खाद्य संस्कृती (Indian food culture) परदेशी लोकांना नेहमीच आकर्षित करत असते. यात परदेशी पाहुणे कोणीही असो, मग ते हॉलिवूडचे (Hollywood) कोणी सेलिब्रिटी (Celebrity) असो किंवा राजकीय नेते (Political leaders). सगळेच या गोष्टींचे चाहते आहेत. ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान (Prime Minister) स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) हे सुद्धा भारतीय पदार्थांचे चाहते आहेत. भारतासोबत व्यापारिक करार यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी स्वत: स्वयंपाक घरात जात खिचडी बनवली आहे. 

भारतासोबत नवीन व्यापार करार झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करताना  प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी शनिवारी खिचडी बनवली आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर टाकला. इतकेच नाहीतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मित्र असं संबोधलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मॅरिसन खिचडी बनवताना दिसत आहेत. ही खिचडी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आवडता पदार्थ आहे.  

दोन देशांमधील व्यापार करार

भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करार अंतर्गत कॅनबेरा, कपडे, चामडे, दागिने आणि क्रीडा संबंधित उत्पादने यांसारख्या बाजारपेठांमध्ये 95 टक्क्यांहून अधिक भारतीय वस्तूंचा करमुक्त प्रवेश सुनिश्चित केला जाणार आहे. 

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो  

मॉरिसनने शनिवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, "भारताशी आमचा नवीन व्यापार करार साजरा करण्यासाठी मी आज रात्री जेवण बनवण्यासाठी निवडलेली करी ही माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात प्रांतातील आहे." यामध्ये त्याच्या आवडत्या खिचडीचाही समावेश आहे.

मॉरिसनचे खिचडी प्रेम 

आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत ते म्हणाले की, 'जेन, मुलगी आणि आई या सगळ्यांना मंजूरी दिली आहे.' पोस्ट केलेल्या फोटोला 12 हजारांहून अधिक 'लाइक्स' आणि 900 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुलाखतींमध्ये खिचडी ही आपला आवडता पदार्थ असल्याचं म्हटलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी