Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे 28 जण अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरू

Avalanche in Draupadi Danda mountain: एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. हिमस्खलनामुळे 28 जण अडकल्याचं वृत्त असून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

avalanche at draupadi danda 2 mountain in uttarakhand 28 people fear to trapped read in marathi
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना; 28 जण अडकल्याची भीती 
थोडं पण कामाचं
  • उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना
  • उत्तरकाशीत हिमस्खलनात 28 जण अडकले
  • उत्तरकाशीतील भटवाडीमध्ये द्रौपदीच्या डांडा 2 मध्ये हिमस्खलनामुळे दुर्घटना

Uttarkashi Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशीत झालेल्या हिमस्खलनात 28 गिर्यारोहक अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. (avalanche at draupadi danda 2 mountain in uttarakhand 28 people fear to trapped read in marathi)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी भारतीय सैन्याकडे मदत मागितली आहे. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली असून हवाई दलाची मदत मागितली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिर्यारोहकांची 122 जणांची एक टीम बेसिक आणि अ‍ॅडवान्स कोर्ससाठी गेले होते. त्याचवेळी हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेत 28 गिर्यारोहक अडकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केलं. या घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी माहिती देताना सांगितले की, "द्रौपदी डांडा-2 पर्वताच्या परिसरात हिमस्खलनात अडकलेल्या नागरिकांना लवकरच सुखरूप बाहेर काढण्यात येईल. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्य दल आणि आयटीबीपीचे जवान मदत करत आहेत."

हे पण वाचा : भारताविषयीच्या या रंजक गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील

मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवर चर्चा करत रेस्क्यू ऑपरेशन अधिक वेगाने करण्यात यावे यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी