Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये बाबा केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही

Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये सकाळी हिमस्खलन झाले आहे. केदारनाथ मंदिराजवळ बर्फाचा एक कडा कोसळला आहे. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून यात कशा प्रकारे हे हिमस्खलन झाले हे दिसत आहे.

uttarakhand avalanche
उत्तराखंडमध्ये बाबा केदारनथ मंदिराजवळ हिमस्खलन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तराखंडमध्ये सकाळी हिमस्खलन झाले आहे.
  • केदारनाथ मंदिराजवळ बर्फाचा एक कडा कोसळला आहे.
  • ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून यात कशा प्रकारे हे हिमस्खलन झाले हे दिसत आहे.

Avalanche in Uttarakhand : देहरादून : उत्तराखंडमध्ये सकाळी हिमस्खलन झाले आहे. केदारनाथ मंदिराजवळ बर्फाचा एक कडा कोसळला आहे. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून यात कशा प्रकारे हे हिमस्खलन झाले हे दिसत आहे. (Avalanche in Uttarakhand near kedarnath temple no damage report)

अधिक वाचा : Fake identity for sim: व्हॉट्सअपवर खोटं नाव सांगितलं तर पडेल दंड, होईल तुरुंगवास!

दरम्यान बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी हिमालय क्षेत्रात हिमस्खलन झाले आहे. असे असले तरी या दुर्घटनेत केदारनाथ मंदिराला कुठलीही हानी पोहोचलेली नाही. 


केदारनाथमध्ये अशा प्रकारे झालेली हिमस्खलनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 21  सप्टेंबर 2022 रोजी एका हायवेवर भुस्खलन झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जिवीतनाही झाली नव्हती. परंतु चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या यात्रेवर पावसाने प्रभाव पडला होता. केदारनाथ मंदिर हे रुद्रप्रयाग जिल्ह्यात येतं. भगवान शंकराचे मंदिर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणहून 86 किमी दूर आहे. हे मंदिर देशातील 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. या मंदिराचा चार धाम यात्रेत समावेश होतो. हे ठिकाण पृथ्वीवरील शिव लोक म्हणून प्रसिद्ध आहे. हवामानामुळे हिवाळ्यात हे मंदिर बंद असतं. एप्रिल किंवा मे महिन्यात अक्षय तृतीयानंतर हे मंदिर पुन्हा दर्शनासाठी सुरू होतं. 

अधिक वाचा : Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

 
हिवाळ्यात जेव्हा हे मंदिर बंद असतं, तेव्हा रुद्रप्रगायच्या उक्तिमठमध्ये बाबा केदारची पुजा अर्चना होते. सहा महिने उक्तिमठात बाबा केदारची पुजा झाल्यानंतर नेहमीच्या ठिकाणी ही पुजा सुरु होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी