Al-Qaeda Chief Killed: म्होरक्या जवाहिरीला स्वतःचीच 'ही' सवय पडली महागात, CIA नं 'असा' केला दहशतवाद्याचा खात्मा

Chief of terror outfit Al-Qaeda Ayman al-Zawahiri was killed: अल कायदा (al-Qaeda) संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला (Ayman al-Zawahiri) ठार केल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

Ayman al-Zawahiri
अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ठार केलं 
थोडं पण कामाचं
  • ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) जवाहिरी मारला गेल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
  • अमेरिकेनं ओसामा बिन लादेनच्या स्टाईलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ठार केलं.

काबूल: Ayman al-Zawahiri killed in US drone strike: अल कायदा (al-Qaeda) संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला (Ayman al-Zawahiri)  ठार केल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) जवाहिरी मारला गेल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेनं ओसामा बिन लादेनच्या स्टाईलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ठार केलं. अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल ( Kabulयेथील त्याच्या सुरक्षित आश्रयस्थानावर ड्रोन हल्ला करून  ही मोठी कारवाई केली आहे. 

याआधी जवाहिरी पाकिस्तानात लपून बसला होता पण तालिबान सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यानं आपलं ठिकाण बदलून काबूलमध्ये गेला. तालिबानचे गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी याने त्यांना अत्यंत सुरक्षित तळावर आश्रय दिला होता सांगितलं जात आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,  जवाहिरीला त्याच्या घराच्या बाल्कनीत वारंवार जाण्याची सवय होती, त्याचमुळे त्याची ही सवय त्याला महागात पडली. 

अधिक वाचा- शिवसेना पक्ष लवकरच संपणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या CIA अधिकाऱ्यांना जवाहिरीच्या बाल्कनीत फिरण्याच्या सवयीमुळे तो काबूलमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाईल डागून जवाहिरीला ठार केलं. अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यात  हक्कानीचा मुलगा आणि जावईही मारले गेल्याचंही वृत्त आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, आम्ही आमच्या शत्रूंना सांगू इच्छितो की ते कुठेही लपले असतील, आम्ही त्यांना ठार करू. जवाहिरी 71 वर्षांचा झाला होता आणि लादेनच्या मृत्यूनंतर 11 वर्षे सतत त्याचे व्हिडिओ जारी करून जगाला धमकावत होता. जवाहिरीवर अमेरिकेने कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.

गेल्या 6 मागोव्यावर होती अमेरिकेची गुप्तचर संस्था 

जवाहिरीच्या मृत्यूबाबतची माहिती देताना बायडेन म्हणाले की, हा दहशतवादी अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याच्या नियोजनात सहभागी होता. ज्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले होते. गेल्या अनेक दशकांपासून जवाहिरी हा अमेरिकन नागरिकांच्या हत्येचा सूत्रधार होता. आता न्याय मिळाला आहे. पुढे बायडेन म्हणाले की, 6 महिन्यांपूर्वी जवाहिरी अफगाणिस्तानात पोहोचल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर संस्थेला मिळाली होती. तो तिथे आपल्या कुटुंबासह राहायला आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी