Ayodhya Dispute : अयोध्या प्रकरणात कोर्टाने मागवला मध्यस्थी समितीचा अहवाल

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2019 | 13:03 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Ayodhya Dispute : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणात १८ जुलै रोजी मध्यस्थी करणाऱ्या पॅनेलला आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालात जर, प्रगती दिसली नाही तर खंडपीठ २५ जुलैला सुनावणी करेल.

Supreme Court
आयोध्या प्रकरणात मध्यस्थता समितीचा मागवला अहवाल   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
  • मध्यस्थता समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश
  • समितीला १८ जुलैला अहवाल सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने १८ जुलै रोजी मध्ये मध्यस्थी करणाऱ्या पॅनेलला आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मध्यस्थी करणाऱ्या पॅनेलच्या अहवालात जर, कोणतिही प्रगती दिसली नाही तर, खंडपीठ या प्रकरणात २५ जुलैला सुनावणी करेल. परंतु, खंडपीठ आपले आधीचे निर्णय बदलणार नाही. या प्रकरणात हिंदू पक्षकारांनी लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी याचिका दाखल केली आहे. आयोध्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मध्यस्थी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. हिंदू पक्षकार मध्यस्थी समितीवर टीका करत असून, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे सांगत आहेत. तर, मुस्लिम पक्षकारांनी मध्यस्थी समितीवर यावेळी टीका करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मध्यस्थी समितीवर आता टीका नको!

या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात युनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात ही सुनावणी सुरू आहे. मध्यस्थी समितीच्या प्रगतीनंतर या प्रकरणाच्या सुनावणीची सीमा वाढवण्यात आल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या समितीच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही याचिका दाखल करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, अयोध्या प्रकरणात मध्यस्थी समितीचा कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. परंतु, खंडपीठ आपल्या आधीच्या निर्णयांवर ठाम आहे. मुस्लिम पक्षकारांच्या वतीने वकील राजीव धवन यांनी सांगितले की, या वेळी मध्यस्थी समितीवर टीका करणे योग्य नाही. मध्यस्थी समिती आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहे. जर, मध्यस्थी समितीतील तीन मध्यस्थ वेगवेगळ्या पक्षांशी जोपर्यंत संवाद करत आहेत. तोपर्यंत त्यांच्या प्रयत्नांवर कोणत्याही प्रकारची शंका घेतली जाऊ नये.

 

 

 

 

मध्यस्थी समितीला हिंदू पक्षकारांचा विरोध

हिंदू पक्षकारांच्या वतीने वकील परराशन काम पाहत आहेत. त्यांनी मध्यस्थी समितीच्या विरोधात राग आळवला आहे. पराशरन म्हणाले, ‘आता हे स्पष्ट झाले आहे की, मध्यस्थी समिती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आपला वेळ न दवडता सुनावणीची तारीख द्यायला हवी.’ सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणी दरम्यान, मध्यस्थी समितीच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, आम्हीच या विषयावर मध्यस्थी समितीची स्थापना केली होती. आता कोर्ट समितीच्या अहवालाची वाट पाहत आहे. हे प्रकरण केवळ एका जमिनीच्या तुकड्याशी जोडले गेलेले नाही. तर, तो देशातील तमाम नागरिकांच्या भावनांचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या संवेदनशील विषयावर अतिशय धैर्याने पुढे जायला हवे. तुम्ही आता मध्यस्थी समितीच्या अहवालाची वाट पहावी, असे खंडपीठाने सुनावणी दरम्यान सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Ayodhya Dispute : अयोध्या प्रकरणात कोर्टाने मागवला मध्यस्थी समितीचा अहवाल Description: Ayodhya Dispute : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणात १८ जुलै रोजी मध्यस्थी करणाऱ्या पॅनेलला आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालात जर, प्रगती दिसली नाही तर खंडपीठ २५ जुलैला सुनावणी करेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles