Ram Lalla Darshan : अयोध्येत नवा विक्रम, नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ लाख १२ हजार भाविकांनी घेतले 'रामलल्ला'चे दर्शन

Ayodhya Ram Lalla darshan on 1 January 2022: अयोध्येत नवा विक्रम स्थापन झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ लाख १२ हजार भाविकांनी 'रामलल्ला'चे दर्शन घेतले.

Ayodhya Ram Lalla darshan on 1 January 2022
अयोध्या १ जानेवारी २०२२ : दिवसभरात १ लाख १२ हजार भाविकांनी घेतले 'रामलल्ला'चे दर्शन 
थोडं पण कामाचं
  • अयोध्येत नवा विक्रम, नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ लाख १२ हजार भाविकांनी घेतले 'रामलल्ला'चे दर्शन
  • अयोध्या हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र ठरणार
  • भाविकांच्या गर्दीमुळे अयोध्येतील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Ramlalla darshan on new year : अयोध्या : रामाच्या (Ram/Shriram) नगरीत अयोध्येत (Ayodhya) नवा विक्रम स्थापन झाला.  नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ लाख १२ हजार भाविकांनी 'रामलल्ला'चे दर्शन घेतले. नव्या वर्षाची सुरुवात भगवान रामाच्या आशीर्वादाने व्हावी या हेतूने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

रामाच्या दरबारात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या दर्शनाची उत्सुकता होती. अयोध्येत जत्रा भरल्याचे चित्र होते. भाविकांच्या उपस्थितीतच रामलल्लाला शनिवार १ जानेवारी २०२२ रोजी छप्पन्न पदार्थ प्रसाद (राजभोग) म्हणून अर्पण करण्यात आले. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गर्दीवरुनच अयोध्या हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र ठरणार असा अंदाज पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. पहिल्या दिवशी झालेल्या गर्दीमुळे अयोध्येतील हॉटेल, लॉज, धर्मशाळा, मिठाईची दुकानं या ठिकाणी लगबग दिसली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन भाविकांच्या संख्येबाबतची माहिती ट्वीट करण्यात आली. या ट्वीटनुसार नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवार १ जानेवारी २०२२ रोजी १ लाख १२ हजार भाविकांनी 'रामलल्ला'चे दर्शन घेतले. अयोध्येत 'रामलल्ला' आणि हनुमान गढी येथे भगवान हनुमान यांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होती. दिवसभर भाविकांची गर्दी, पूजा-अभिषेक, आरती यांची रेलचेल होती. शयन आरती होईपर्यंत 'रामलल्ला'चे दर्शन घेण्यासाठी गर्दी होती. 

सकाळी 'रामलल्ला'ची आरती झाली आणि प्रसाद अर्पण करण्यात आला. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप सुरू झाले. दिवसभर भाविकांच्या गर्दीमुळे अयोध्येतील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले. येणाऱ्या काळात अयोध्येत येणाऱ्या भाविकांमुळे व्यवसायाला चांगले दिवस येणार असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला. याआधी शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हनुमान गढी येथे जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. पूजन केले. मंदिराच्या पुजाऱ्याला मानाची पगडी दिली. मंदिरातील महंतांनी प्रेमाची भेट म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना गदा दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी