Kumar Vishwas on Ayodhya Verdict: अयोध्या निर्णयावर कुमार विश्वास म्हणतात की...

Kumar Vishwas reaction on Ayodhya Verdict: प्रत्येक मुद्दयावर प्रामाणिकपणे आपलं मत मांडणारे राजकारणी आणि कवि कुमार विश्वास यांनी अयोध्या वादग्रस्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.

Kumar vishwas
Ayodhya Verdict: अयोध्या निर्णयावर कुमार विश्वास म्हणतात की... 

अखेर अयोध्या वादग्रस्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपला अंतिम निर्णय दिला आहे.  १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली.  सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशाच्या खंडपीठानं शनिवारी या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, अयोध्यामध्ये 2.77 एकर वादग्रस्त जमिनीवर राम रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी 5 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या प्रकरणाच्या निकालावर राजकारणी आणि कवि डॉ. कुमार विश्वास यांनी खूपच मनोरंजक ट्विट्स केलेत. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मेरे राम, मैं कुछ बोल नहीं पा रहा...

आणखी एक प्रतिक्रियेत कुमार विश्वास म्हणाले की, 
 
अवधपुरी सम प्रिय नहिं सोऊ। 
यह प्रसंग जानइ कोउ कोऊ।।
जन्मभूमि मम पुरी सुहावनि। 
उत्तर दिसि बह सरजू पावनि।।

“गिरा अरथ जल बीचि सम कहिअत भिन्न न भिन्न। 
बंदउँ सीता राम पद जिन्हहि परम प्रिय खिन्न॥”
बोलिए मर्यादा पुरुषोत्तम राम की जय
(इस जयकार के बाद “मर्यादा” शब्द को दोबारा ज़रूर दोहराइए, पालन कीजिए अन्यथा इस समय छलक उठे ख़ुशी के आँसुओं के साथ न्याय नहीं होगा ) 

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ट्रस्ट स्थापन करून त्या जागी मंदिर बांधण्यात यावं. केंद्र शासनाने मान्य केल्यास निर्मोही अखाडा यांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल. मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत अन्यत्र ठिकाणी ५ एकर जमीन दिली जावी. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, 'केंद्र सरकार ३-४ महिन्यांत ट्रस्ट स्थापन करुन मंदिर बांधण्यासाठी वादग्रस्त जागा या ट्रस्टकडे सोपवण्यात यावी. मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने नियमावली तयारी करावी, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...