Ayodhya Ram Mandir News When will Ram Lalla seat in the sanctum sanctorum of the grand Ram temple date has come : रामाची नगरी अयोध्या येथील राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यातील (गर्भगृह) आधारशिला पूजन बुधवार १ जून २०२२ रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा विधी होणार आहे. सकाळी नऊ वाजता विधी सुरू होतील. दोन तास विधी होतील. गाभाऱ्याच्या निर्मितीआधी वैदिक पद्धतीने पूजा होईल. या विधीला निवडक मान्यवर उपस्थित असतील.
राम मंदिराचे काम दिवस रात्र असे २४ तास सुरू असते. मंदिरात सर्व ठिकाणी पायाखालची जमीन एक सारखी असावी यासाठी ग्रॅनाईट दगडाचा वापर केला जात आहे. पायाखालची जमीन तयार करण्याकरिता १७ हजार ग्रॅनाईटचे दगड वापरण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत पाच हजार दगडांचा वापर करून झाला आहे. पुढील काम सुरू आहे. आता १ जून रोजी पूजा झाल्यानंतर गाभाऱ्याचे काम सुरू होईल.
भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी २४ जानेवारी २०२४ ही तारीख नमूद केली आहे. याच दिवशी राम मंदिरात रामलल्ला यांची स्थापना केली जाईल. बग्गा यांच्या ट्वीटच्या निमित्ताने पहिल्यांदा रामलल्ला यांच्या गाभाऱ्यातील स्थापना दिवसाची तारीख जाहीर झाली आहे.
संपूर्ण राम जन्मभूमी परिसर आकर्षक रोषणाईने सजला आहे. गाभाऱ्याच्या चहूबाजुंना आकर्षक रांगोळ्या काढल्या जातील. तात्पुरते राम मंदिर जिथे उभारले आहे त्या ठिकाणाला फुलांनी सजविले जाईल. कार्यक्रमासाठी व्हीआयपींच्या बसण्याची विशेष व्यवस्था असेल. भाविकांच्या बसण्यासाठीही व्यवस्था केली जाईल. सुरक्षिततेसाठी निवडक सदस्यांना कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून बघता येईल. इतरांना टीव्ही तसेच सोशल मीडिया, यू ट्युब यांच्या माध्यमातून लाइव्ह व्हिडीओ बघून कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असेल.