Ayodhya Case: अयोध्या राम मंदिर प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण, पाहा काय घडलं...

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 16, 2019 | 16:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ayodhya land case: अयोध्येमधील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आहे. पाहूयात याच संदर्भातील सर्व अपडेट्स...

Ayodhya ram mandir temple babri masjid land case hindu maha sabha final hearing sc check live updates marathi
अयोध्या राम मंदिर प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
 • संध्याकाळी पाच वाजेपर्यंत युक्तीवाद पूर्ण करण्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले होते
 • खटल्यासाठी आखणीन वेळ देऊ शकत नाही - सरन्यायाधीश 
 • निर्धारित वेळेच्या एक तास आधी सुनावणी पूर्ण

 नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. अयोध्या प्रकरणाच्या खटल्यातील ४०वी आणि शेवटची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सुनावणी सुरु होताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं, आता खूप झालं खटल्यासाठी आणखी वेळ देऊ शकत नाही.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचे अपडेट्स

 

 1. खटल्याबाबत सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला
 2. सर्व बाजूंचे युक्तीवाद पूर्ण 
 3. सर्वोच्च न्यायालयात हाय व्होल्टेज ड्रामा, हिंदू महासभेने न्यायालयात सादर केलेला नकाशा मुस्लिम पक्षकारांच्या वकील राजीव धवन यांनी फाडला 
 4. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करा - सरन्यायाधीश 
 5. खटल्यासाठी आणखी वेळ देऊ शकत नाही - सरन्यायाधीश
 6. खटल्याच्या सुनावणीस वेळ वाढवून देण्यास नकार
 7. अयोध्या खटल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तीवाद सुरु

ओयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने उत्तरप्रदेश राज्य सरकारला सतर्कतेचे आणि अतिदक्षतेचे निर्देश दिले आहेत. यासोबतच ओयोध्येत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आळी असून सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी