काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद? जाणून घ्या घटनाक्रम

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2019 | 10:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

राम मंदिर आणि बाबरी मशीदीचा वाद हा १५ व्या शतकापासून आहे. असा आरोप करण्यात आला होता की १५ व्या षटकात रामाचे मंदिर पाडले होते आणि त्या वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद बांधण्यात आली.

ayodhya ram mandir temple babri masjid land case timeline news in marathi google batmya
काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद? जाणून घ्या घटनाक्रम 

मुंबई :  राम मंदिर आणि बाबरी मशीदीचा वाद हा १५ व्या शतकापासून आहे. असा आरोप करण्यात आला होता की १५ व्या शतकात रामाचे मंदिर पाडले होते आणि त्या वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद बांधण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत हा वाद सुरू आहे. पाहू या या सर्व वादाची टाइम लाइन... 


राम मंदिर आणि बाबरीचा घटनाक्रम... 

 1. अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच रामाचा जन्म झाल्याची धारणा अनेक हिंदूंची भावना आहे
 2. १५ व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप करण्यात आला आहे. 
 3. १५ व्या शतकात मंदिर पाडून त्या वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे
 4. १८५३ मध्ये हिंदू संघटनांनी हा आरोप केला की राम मंदिर पाडून या ठिकाणी मशीद उभारली आहे. या आरोपावरून पहिल्यांदा देशात हिंदू मुस्लीम दंगलही झाली होती. 
 5. १८५९ मध्ये ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर तारांचे कुंपण घालून, या कुंपणाबाहेर आणि आतमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना वेगवेगळी प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली होती. 
 6. १८८५ मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयात दाखल झाले. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद (अयोध्या) येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं होते. 
 7. २३ डिसेंबर १९४९ : जवळपास ५० हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, ज्यानंतर हिंदू बांधव पूजा करू लागले, मात्र मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करणं बंद केलं होते. 
 8. १६ जानेवारी १९५० : गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात अपील करुन रामलल्लाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली
 9. ५ डिसेंबर १९५० : महंत रामचंद्र दास यांनी हिंदूंनी प्रार्थना सुरु ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली, यावेळी मशिदीला पहिल्यांदाच ‘ढाँचा’ असा शब्द वापरण्यात आला
 10. १७ डिसेंबर १९५९ : निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टाचा दरवाजा खटखटला. 
 11. १८ डिसेंबर १९५९ : उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून न्यायलयात धाव घेतली होती.
 12. १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीला लावले कुलुप उघडण्यासंदर्भात आणि रामजन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा त्यावेळीच करण्यात आली होती. 
 13. १९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलुपं उघडण्यात आली मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीची स्थापना केली.
 14. १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने विहिंपच्या भूमिकेला औपचारिकरित्या पाठिंबा दिला, ज्यामुळे मंदिराचे थंड पडलेले आंदोलन जोशात सुरू झाले
 15. जुलै १९८९ मध्ये या प्रकरणातला पाचवा खटला दाखल करण्यात आला.
 16. १९९० मध्ये भाजपाचे अध्यक्ष असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून उत्तरप्रदेशातल्या अयोध्येपर्यंत राम मंदिरासाठी एक रथयात्रा काढली, ज्यानंतर दंगली उसळल्या.
 17. १९९० मध्ये अडवाणींना समस्तीपूरमधून अटक करण्यात आली, ज्यानंतर भाजपाने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला. 
 18. ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारने बाबरी मशिदीच्या शेजारी असलेल्या २.७७ एकर जमिनीचा ताबा घेतला
 19. ६ डिसेंबर १९९२ हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली, ज्यानंतर जातीय दंगली उसळल्या, घाईने तात्पुरत्या स्वरुपाचे एक मंदिर तयार करण्यात आले
 20. १९९२ पासून हे प्रकरण प्रलंबितच आहे. 
 21. १६ ऑक्टोबर २०१९ : अयोध्या प्रकरणाची आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. अयोध्या प्रकरणाच्या खटल्यातील ४०वी आणि शेवटची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सुनावणी सुरु होताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं, आता खूप झालं खटल्यासाठी आणखी वेळ देऊ शकत नाही, आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण करावी लागणार. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी