अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरणी चौघांना जन्मठेप, एकाची सुटका

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 18, 2019 | 17:32 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

2005 Ayodhya terror attack: 2005 साली झालेल्या अयोध्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi Veena opens up on her sweet tooth
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दोषींना मंगळवारी (18 जून) शिक्षा सुनावली. 2005 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने चार दोषींना जन्मठेप सुनावली आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 साली अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता. या प्रकरणाची न्यायालयात मोठी सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे.

या दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी नॅनी सेंट्रल कारागृहात बंद आहेत. हे सर्व आरोपी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. 2005 साली जुलै महिन्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी राम जन्मभूमीत दाखल झाले होते. दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात जवळपास दोन तास चकमक झाली होती. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दोन नागरिकांचाही मृत्यू झाला होता.

या प्रकरणी आसिफ इकबाल, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज, शकील अहमद आणि डॉ. इरफान यांची नावे समोर आली होती. या सर्व आरोपींना फैजाबाद कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, 2006 मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी नॅनी सेंट्रल कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत एकूण 63 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयातील न्यायाधीश करत होते.

पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली होती की, या दहशतवाद्यांनी जम्मूमध्ये हे षडयंत्र रचलं होतं. दहशतवाद्यांनी मार्शल कारमध्ये बंदूक आणि इतर शस्त्र ठेवली होती. दहशतवाद्यांनी जुलै 2005 रोजी सकाळच्या सुमारास राम जन्मभूमी परिसरात प्रवेश केला आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता तर इतरांना अटक करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरणी चौघांना जन्मठेप, एकाची सुटका Description: 2005 Ayodhya terror attack: 2005 साली झालेल्या अयोध्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल