Ayodhya PHOTOS: दुर्मिळ फोटोजमधून पाहा अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाची झलक

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2019 | 18:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Ayodhya PHOTOS: सर्वोच्च न्यायालयाने अखेर राम मंदिर - बाबरी मशीद वादावर आपला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पाहूयात या वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित काही दुर्मिळ फोटोज.

ayodhya verdict old photos ram janmabhoomi babri masjid check full details marathi news
Ayodhya PHOTOS: दुर्मिळ फोटोजमधून पाहा अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाची झलक 

नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जागेवर सर्वोच्च न्यायालयाने अखेर आपला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या जागेवर राम मंदिर बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.

न्यायाधीश शरद अरविंद बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूज आणि न्यायाधीश अब्दुल नजीर यांचा या पीठातील पाच न्यायाधीशांमध्ये समावेश आहे. 

५०० वर्षे जुन्या वादाचा शेवट करुन सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरुन निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला. मशिदीसाठी न्यायलयाने पाच एकर चागा देण्यासं सांगितले आहे. खंडपीठाने पुढे म्हटले की, वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी एक ट्रस्ट तयार करण्यात येईल. पाहूयात अनेक वर्षांपासून वादात राहिलेल्या अयोध्या प्रकरणाशी संबंधित काही दुर्मिळ फोटोज...

Ayodhya Dispute pic

१९९२ मध्ये बाबरी मशिदीबाहेर तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवान.

Ayodhya Ram Mandir Babri Masjid pics

२०१० साली एका व्यक्तीने अयोध्येतील वादग्रस्त वास्तू जवळ असलेल्या एका मशिदीबाहेर एक मुस्लिम व्यक्ती नमाज पठण केल्यानंतर एका पुजाऱ्यासोबत दिसल्याचे छायाचित्र.

Ayodhya photos

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर उत्खनन केले त्यावेळी सापडेले खांब.

Ayodhya Ram Mandir Babri Masjid pics

डॉ आर. नागस्वामी (पुरातत्व संचालक (सेवानिवृत्त) माजी कुलगुरू, कांचीपुरम विद्यापीठ) हे जुना फोटो दाखवताना.

Ayodhya photos

२०१३ मध्ये अयोध्येत सुरक्षाव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी.

Ayodhya Ram Mandir Babri Masjid pics

२०१७ चा हा फोटो, दिवाळी दरम्यान अयोध्यातील रामपदीची सजावट करताना.

Ayodhya photos

२०१८ साली अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात पक्ष चर्चा करताना.

Ayodhya photos

२०१८ मध्ये अयोध्येत एका धार्मिक सभेचे आयोजन केले होते त्या दरम्यान तैनात सुरक्षा जवान.

Ayodhya Ram Mandir Babri Masjid pics

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...