बाबा रामदेव यांचं मुसलमान आणि इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य, मौलानांचा संताप

Baba Ramdev Controversial Statement: योग गुरु बाबा रामदेव यांनी मुस्लिमांच्या नमाज वाचण्याच्या आणि धर्म परिवर्तन संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. 

baba ramdev controversial statement against muslims and islam
बाबा रामदेव यांचं मुसलमान आणि इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य, मौलानांचा संताप (फाईल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • इस्लाम संदर्भात बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान
  • राजस्थानमधील बाडमेर येथे एका कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलं

Baba Ramdev controversy: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित चमत्कारांचा वाद सुरू आहे. त्याच दरम्यान आता योग गुरू बाबा रामदेव यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. राजस्थानमधील बाडमेर येथे बाबा रामदेव यांनी मुस्लिम आणि इस्लाम संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

बाबा रामदेव यांनी एका कार्यक्रमात म्हटलं, इस्लाम धर्माचा अर्थ केवळ नमाज पठण करणं आहे. मुसलमानांनी केवळ नमाज पठण करणं गरजेचं आहे. नमाज पठण केल्यावर काहीही करा, ते सर्व योग्य असेल. मग ते, हिंदू मुलींना उचलून नेणे असो किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून जे हवं ते करा.

हे पण वाचा : भारतात हा तांदूळ सर्वात जास्त खाल्ला जातो

ख्रिश्चन धर्माबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं, दिवसा चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती पेटवा सर्व पाप धुतली जातील. पण हिंदू धर्मात असे काहीही होत नाही. योग गुरु बाबा रामदेव यांच्या मते, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. मात्र, तरीही सर्वजण मिशी कापत आहेत. टोपी परिधान करत आहेत हा सर्व वेडसरपणा आहे. संपूर्ण समाजाचं धर्मपरिवर्तन करुन इस्लामी बनवायचं आहे. हाच त्यांचा उद्देश आहे. मात्र, हिंदू धर्मात असे काही होत नाही.

हे पण वाचा : ब्लड कॅन्सर टाळण्याचे उपाय

बाबा रामदेव यांच्या विधानाचा विरोध

रिपोर्ट्सनुसार, बरेलीतील दरगाह आला हजरतशी संबंधित संघटना ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी योग गुरू बाबा रामदेव यांच्या विचारांचा विरोध केला आहे. मौलानांनी म्हटलं, बाबा रामदेव यांनी आधी इस्लाम धर्माचा अभ्यास करायला हवा आणि मगच बोलायला हवं. ज्यांनी इस्लाम धर्माबाबत वाचन केलेलं नाहीये त्यांना इस्लाम संदर्भात बोलण्याचा अधिकार नाहीये.

हे पण वाचा : खोकल्यावर घरगुती आणि रामबाण उपाय

यापूर्वीही वादग्रस्त विधान

बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरुन सुद्धा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं की, महिला साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये छान दिसतात. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा छान दिसतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी