बाबा वेंगाचे भारताविषयीचे धक्कादायक भविष्य खरे होणार का?

baba vanga most dangerous prediction for india 2022 details match from asia europe and middle east : आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांनी भारताविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे.

baba vanga
बाबा वेंगाचे भारताविषयीचे धक्कादायक भविष्य खरे होणार का?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बाबा वेंगाचे भारताविषयीचे धक्कादायक भविष्य खरे होणार का?
  • भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे
  • बाबा वेंगा यांनी आतापर्यंत जगाविषयी अनेक चक्रावणारी भाकिते केली आहेत

baba vanga most dangerous prediction for india 2022 details match from asia europe and middle east : आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांनी भारताविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. या कालावधीत हे भविष्य खरे ठरले नाही तर बाबा वेंगा याच्या चुकलेल्या भविष्यवाणींमध्ये या भाकिताचा समावेश होईल. बाबा वेंगा यांनी आतापर्यंत जगाविषयी अनेक चक्रावणारी भाकिते केली आहेत. यापैकी काही भाकिते खरी ठरली आहेत तर काही चुकीची ठरली आहेत. 

बाबा वेंगा यांना बाल्कन नॉस्ट्रडेमस असेही म्हणतात. या बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 2022 या वर्षात आशियाई देशांवर अनेक नैसर्गिक संकटे येणार आहेत. भूकंप, पूर, दुष्काळ, टोळधाड, आजारांचे संकट, त्सूनामी, वातावरणावर झालेल्या परिणामांमुळे जलचक्र बिघडणे अशी संकटे येतील. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होईल. यातील काही भविष्य खरी ठरली आहेत. 

'द सन' मध्ये बाबा वेंगा यांची धक्कादायक भविष्यवाणी प्रसिद्ध झाली आहे. या भविष्यवाणीनुसार आशियाई देशांपैकी काही देशांना कोरोना तसेच इतर आजारांच्या संकटाचा मोठा फटका बसला. काही देशांमध्ये पुरांमुळे तर काही देशांमध्ये दुष्काळामुळे शेतीची वाताहात झाली. पिकांचे नुकसान झाले. यामुळे अडचणीत सापडलेल्या अनेकांना घरदार सोडून नव्या सुरक्षित ठिकाणाच्या शोधात बाहेर पडावे लागले. आशियातील काही देशांना टोळधाडीचा मर्यादीत फटका बसला. पण  बाबा वेंगा यांनी जेवढी भीती व्यक्त केली होती. प्रत्यक्षात टोळधाडीमुळे तेवढे मोठे संकट आशियाई देशांमध्ये निर्माण झाले नाही. 

भारताच्या तुलनेत टोळधाड आणि पुराचा मोठा फटका पाकिस्तानला बसला. पाकिस्तान हा देश 1947च्या आधी भारताचा भूभाग होता. बाबा वेंगा यांनी भारताविषयी केलेली भीतीदायक भविष्य सध्या पाकिस्तानच्या बाबतीत खरी होताना दिसत आहेत. भारतात संकट असले तरी त्याचे प्रमाण मर्यादीत आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील संकटाची तीव्रता कमी आहे. या उलट पाकिस्तानमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पूर येऊ शकतो, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती. 'द सन'च्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता. 

Saving Account : सेव्हिंग अकाऊंट बंद करायचे असेल तर या चुकांपासून राहा सावध, नाहीतर होईल नुकसान

Bank holidays in October : आया मोसम छुट्टीयों का...ऑक्टोबरमध्ये बॅंका 21 दिवस बंद, पाहा संपूर्ण यादी

१९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे १९६६ मध्ये निधन झाले. जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी इसवीसन ५०७९ पर्यंतची भविष्यवाणी लिहिली. बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीपैकी ८५ टक्के भविष्यवाण्या अगदी बरोबर असल्याचे सिद्ध झाले.

बाबा वेंगा हे बल्गेरियाचे भविष्यवेत्ते आहेत आणि यापूर्वी त्यांनी बर्‍याच महत्त्वाच्या घटनांसाठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), ९/११चा हल्ला, २०१० अरब स्प्रिंग आणि जपान त्सुनामी (२००४) यासारख्या ऐतिहासिक भविष्यवाण्या मोठ्या प्रमाणात सत्यात उतरल्या आहेत. यामुळे बाबा वेंगा यांची भाकिते प्रत्यक्षात आली तर खऱ्या ठरलेल्या आणि प्रत्यक्षात आली नाही तर चुकीच्या ठरलेल्या भाकितांमध्ये समाविष्य होतात. भारताविषयीचे त्यांचा चिंता वाढविणारे भाकीत खरे ठरते की खोटे हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी