Ed ‘बच्चन’ कुटुंबाच्या मागे !, पनामा पेपर लिक प्रकरणात ऐश्वर्याला समन्स

Aishwarya Rai Bachchan Summoned By Enforcement Directorate : जगप्रसिद्ध पनामा पेपर लीक प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.  आज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला ईडीने दिल्लीतील लोकनायक भवनात हजर राहण्यास सांगितले आहे.

। 'Bachchan' family inquiry from Ed !, summons Aishwarya in Panama Paper leak case
Ed ‘बच्चन’ कुटुंबाच्या मागे !, पनामा पेपर लिक प्रकरणात ऐश्वर्याला समन्स   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पनामा पेपर लीक प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ
  • ऐश्वर्या राय हिला ईडीने दिल्लीतील लोकनायक भवनात हजर राहण्यास सांगितले आहे.
  • पनाम प्रकरणात करचुकवेगिरीचा आरोप आहे.

मुंबई : जगप्रसिद्ध पनामा पेपर लीक प्रकरणात (Panama Paper Leak Case)आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.  आज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिला ईडीने (Enforcement Directorate) दिल्लीतील लोकनायक भवनात हजर राहण्यास सांगितले आहे.('Bachchan' family inquiry from Ed !, summons Aishwarya in Panama Paper leak case)

सूत्राच्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली आहे. खरं तर पनामा पेपर्स लक प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोक सामील होते. यामध्ये मोठ्या संख्येने नेते, अभिनेते, खेळाडू, उद्योगपती यांच्यासह प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. या लोकांवर पनामा प्रकरणात करचुकवेगिरीचा आरोप आहे. याबाबत कर अधिकारीही तपासात गुंतले आहेत.

ईडीने तपासात बड्या व्यक्तींचा समावेश 

पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचला होता. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही सुपूर्द केली आहेत. पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. ईडीच्या अधिकृत सूत्रांवर विश्वास ठेवला तर लवकरच त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावू शकते.

2016 मध्ये जगभर गाजलेले पनामा पेपर्स लीक प्रकरण काय आहे?

(पनामा पेपर लीक प्रकरण) खरं तर, 2016 मध्ये, यूकेमधील पनामा स्थित एका लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत. पनामा पेपर्समध्ये जगातील अनेक प्रसिद्ध लोकांचा तपशील आहे. ज्यांनी फसवणूक आणि करचुकवेगिरी केली आहे. हे लीक झालेले दस्तऐवज प्रथम Süddeutsche Zeitung या जर्मन वृत्तपत्राने मिळवले होते. अशी सुमारे 12000 कागदपत्रे आहेत, जी भारतीयांशी संबंधित आहेत.

बच्चन कुटुंबियांचेही नाव 

पनामा पेपर लीक प्रकरणात भारतातील जवळपास 500 लोकांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यातील तीन कंपन्या बहामास आणि एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. पनामा प्रकरणात ते 1993 मध्ये झाल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स इतके होते, मात्र या कंपन्या कोट्यवधी रुपयांच्या जहाजांच्या व्यवसायात गुंतल्याचे आढळून आले.


 

पनामा पेपर्स लीक प्रकरणात ऐश्वर्याचे नाव कसे आले?

ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. तीन वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये कंपनी बंद झाली. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी