मैत्रिणीच्या Birthday ला विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार, भावाने कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून काढला Porn Video

gang rape in up : बिजनौर येथील एका आयुर्वेद विद्यार्थिनीने तिच्या मित्राचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराने कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. तसेच तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.

BAMS student gang-raped on girlfriend's birthday, brother mixes drugs in cold drink porn video
मैत्रिणीच्या जन्मदिनी BAMS विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार, भावाने कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून काढला अश्लील video   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बिजनौरमध्ये कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून बीएएमएसच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
  • सामूहिक बलात्कारानंतर तिचा व्हिडिओ बनवला.
  • वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेचे म्हणणे न्यायालयात नोंदवण्यात आले आहे.

बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी एका आयुर्वेद महाविद्यालयात BAMS ची विद्यार्थिनी आहे. तिच्या मैत्रिणीचा भाऊ आणि त्याचा साथीदार असे दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. मेडिकल करून पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. (BAMS student gang-raped on girlfriend's birthday, brother mixes drugs in cold drink porn video)

पिडित तरुणीने फोन केला

जिल्हा पोलीस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी बिजनौरच्या वसतिगृहात राहणाऱ्या बीएएमएस कोर्स करणाऱ्या २० वर्षीय तरुणीने पत्र दिले असून, तिच्या मैत्रिणीचा भाऊ उमर याने तिला १९ डिसेंबर रोजी फोन करून बोलून घेतले. त्याच्या बहिणीचा वाढदिवस असल्याने कारमध्ये बसण्यास सांगितले. त्या कारमध्ये अगोदरच त्याचा मित्र अब्दुलही होता.

मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचा बहाणा

पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही मुलांनी तिला कोल्ड्रिंक पाजले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आणि तिचा व्हिडिओ बनवला. महिलेने सांगितले की, दोन्ही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तिला मारहाण करून तिच्याकडील 8 हजार रुपये हिसकावले आणि रात्री उशिरा रस्त्यात सोडून दिले.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके

पोलीस स्टेशन प्रभारी राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी उमर आणि अब्दुल यांच्या विरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला आणि एससी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थ्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्लाइड पाठवण्यात आली असून, पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी शोध सुरु असून त्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक कुलदीप गुप्ता यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी