PUBG: पबजी गेमवरुन कोर्टानं दर्शवली नाराजी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 15, 2019 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

PUBG: रॉयल बॅटल गेम पबजीवर नेपाळमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेलाय. हा निर्णय कोर्टाच्या आदेशानंतर घेण्यात आला. या गेममुळे अनेक तरुण आणि मुलांवर नकारात्मक परिणाम झालाय.

PUB G
पबजीवर नेपाळमध्ये बंदी  |  फोटो सौजन्य: Representative Image

काठमांडू: पबजी खेळावरून मुंबई हायकोर्टानं शुक्रवारी पालकांना सुनावलं. हायकोर्टात पबजी खेळावर बंदी घालण्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं असं म्हटलं आहे की, 'पालक आपल्या मुलांच्या हातात एवढे महागडे फोन का देतात?' असा सवाल उपस्थित केला होता. पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये योग्य पासवर्ड टाकून तो सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. जेणेकरून असे खेळ मुलं खेळणार नाहीत.

पबजी या खेळामुळे मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीयेत. या गेमच्या व्यसनामुळे त्यांचं जेवणाकडे, झोपण्याकडे सुद्धा लक्ष राहत नाही. यासंदर्भात एका ११ वर्षाच्या मुलानं मुंबई हायकोर्टात त्यांच्या पालकांकडून याचिका दाखल करून घेतली आहे. यात शाळेत पबजी गेमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यावरच आपलं मत मांडतांना कोर्टानं पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे नेपाळमध्ये तर ‘पबजी’वर बंदी घालण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे भारतात हा निर्णय कधी लागू होईल, याकडे सर्व पालकांचं लक्ष लागलं आहे.

नेपाळमध्ये पबजीवर बंदी:

लोकप्रिय मल्टीप्लेअर इंटरनेट गेन ‘पबजी’वर कोर्टाच्या आदेशानंतर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या खेळामुळं देशातील तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये नकारात्मकता वाढत चाललीय, त्यांच्या वागण्यावर या गेमचा परिणाम होत असल्याचं कोर्टानं म्हटलंय. काठमांडू पोस्टमध्ये गुरूवारी आलेल्या बातमीनुसार नेपाळच्या दूरसंचार प्राधिकरण म्हणजेच ‘द नेपाल टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी’नं सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा देण्याऱ्या पुरवठादारांना पबजी या नावानं चर्चेत असलेला ‘प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंडट’ या खेळावर बंदी घालण्याचे आदेश दिले. 

बंदी घातलेला हा खेळ जर बंदीनंतरही कुणी खेळतांना दिसलं तर त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. रिपोर्टनुसार काठमांडू जिल्हा कोर्टानं महानगर गुन्हे शाखेद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला. या याचिकेत पबजी गेम खेळल्यामुळं मुलांमधील नकारात्मक प्रभाव वाढत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर निर्णय देत कोर्टानं या खेळावर बंदी घातली.

कोर्टाच्या निर्णयानंतर गुन्हे शाखेनं नेपाळ दूरसंचार विभागाला पत्र लिहून गेमवर बंदी घालण्यास सांगितलं. एनटीएचे कार्यकारी चेअरमन पुरूषोत्तम खनाल यांनी सांगितलं, ‘गुन्हे शाखेच्या पत्राच्या आधारावर आम्ही सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रदान करणाऱ्यांना या खेळावर बंदी घालण्यास सांगितलं आहे.’

भारतातही पबजीवर बंदी घालण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्रतेने केली जात आहे. जम्मू काश्मीर आणि गुजरातमध्ये या खेळावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर गुजरातच्या अनेक शहारांमध्ये खेळावर बंदी घातली गेलीय. नुकतंच राजकोट पोलिसांनी १० विद्यार्थ्यांना पबजी खेळत अल्यामुळं अटक केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
PUBG: पबजी गेमवरुन कोर्टानं दर्शवली नाराजी Description: PUBG: रॉयल बॅटल गेम पबजीवर नेपाळमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेलाय. हा निर्णय कोर्टाच्या आदेशानंतर घेण्यात आला. या गेममुळे अनेक तरुण आणि मुलांवर नकारात्मक परिणाम झालाय.
Loading...
Loading...
Loading...