Wife Husband Relations: संशयखोर पतीसोबत महिलेने काय केले पाहा!

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 19:49 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Wife Husband Relations: पती तिच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवत होता. तसेच त्याने तिचा फोनही हॅक केला होता. या सगळ्याला कंटाळून संबंधित महिलने पतीच्या डोक्यात बॅट घालून त्याचे डोके फोडून टाकले.

Husband wife relations
पत्नीने पतीचे डोके फोडले   |  फोटो सौजन्य: Representative Image

बेंगळुरू : असं म्हटलं जातं की पती-पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, हा विश्वास नसेल तर ते नातं नातं राहत नाही. तो व्यवहार होतो आणि व्यवहार केव्हाही मोडला जाऊ शकतो. आपल्या पत्नीवर सातत्यानं संशय घेणाऱ्या एका पतीला त्याचे डोके फोडून घ्यावे लागले आहे. धक्कादायक म्हणजे, त्याचे डोके दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, त्याच्या पत्नीनेच फोडले आहे. बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, पती सातत्याने संशय घेत असल्याने संबंधित महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा पती तिच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवत होता. तसेच त्याने तिचा फोनही हॅक केला होता. या सगळ्याला कंटाळून संबंधित महिलने पतीच्या डोक्यात बॅट घालून त्याचे डोकेच फोडून टाकले आहे. दरम्यान, संबंधित पतीची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने स्वतः या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 घटस्फोटासाठी केला होता अर्ज

पती कायम संशय घेत असल्यामुळे बंगळुरूच्या महिलेने एक टोकाचे पाऊल उचलले आहे. पतीने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी घरात तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. तसेच एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तिचा मोबाईल फोन हॅक करून तिला कोणाचे कॉल येतात नाही, यावर तो लक्ष ठेवत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. संबंधित महिलेने पतीकडून घटस्फोट मिळावा यासाठी कोर्टात अर्जही केला होता. पण, यासगळ्याचा शेवट पतीचे डोके फोडण्यासारख्या टोकाच्या निर्णयावर झाला. संशयाला कंटाळलेल्या पत्नीने आपल्या मोठ्या मुलाच्या बॅटने पतीचे डोके फोडून टाकले. ही घटना बंगळुरूमधल्या जयनगर परिसरात घडली आहे. संबंधित महिला आणि तिचा पती यांच्यात ११ वर्षांचे अंतर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचा पती ४४ वर्षांचा होता.

बायको पेक्षा मेहुणी बरी

संबंधित दाम्पत्याचा विवाह २०१०मध्ये झाला होता. संबंधित महिलेच्या पतीचे नाव सुदर्शन आहे आणि तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. सुदर्शन लग्नासाठी मुलगी बघायला गेला असताना त्याला मुलीची धाकटी बहीण आवडली होती. त्याने तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला होता. पण, त्यावेळीती कॉलेजमध्ये शिकत होती. दोघांमद्ये ११ वर्षांचे अंतर होते. पण, सुदर्शनने काहीही करून तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले आणि दोघांचे लग्नही झाले दोन वर्षांनंतर दोघांना एक मुलगाही झाला. पण, त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. सुदर्शन पत्नीवर संशय घेऊन लागला. त्यामुळेच त्यांने घरात सीसीटीव्हीचे जाळे बसवले होते. सुदर्शन पत्नीला कोठेही एकटी बाहेर जाऊ देत नव्हता. या संशयाला कंटाळून पत्नीने सुदर्शनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि बॅटने त्याचे डोके फोडून टाकले. संबंधित पतीची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Wife Husband Relations: संशयखोर पतीसोबत महिलेने काय केले पाहा! Description: Wife Husband Relations: पती तिच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवत होता. तसेच त्याने तिचा फोनही हॅक केला होता. या सगळ्याला कंटाळून संबंधित महिलने पतीच्या डोक्यात बॅट घालून त्याचे डोके फोडून टाकले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles