Raima Islam Shimu Murder : ढाका : बांग्लादेशी अभिनेत्री राईमला इस्लाम शिमू ही एक दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. आज एका गोणीत तिचा मृतदेह आढळला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये केराजीगंज पुलाजवळ एका गोणीत राईमाचा मृतदेह सापडला आहे. राईमचा मृतदेहच काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला होता. तेव्हा त्यांनी तत्काळ पोलीस स्थानकात ही माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी राईमचा पती शखावत अली नोबेल आणि सहा जणांना अटक केली आहे. राईमचा आपण खून केल्याची कबुली पती शखावतने दिली आहे.
Bangladeshi actress #RaimaIslamShimu’s husband has confessed to killing his wife. https://t.co/YFDQXvpVi4
— ETimes (@etimes) January 18, 2022
राईमा इल्साम शिमूच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या आहेत. राईमचे अपहरण करून तिचा खून करण्यात आला आहे. त्यानंतर राईमचा मृतदेह पुलाजवळ फेकण्यात आला होता. राईमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राईमचा पती शखावत अली नोबेल आणि इतर ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तेव्हा पती शखवातने आपण घरगुती वादामुळे राईमाचा खून केल्याची कबुली दिली आहे. ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राईमा बेपत्ता झाल्यानंतर पती शखावतनेच पोलिसांतात तक्रार दाखल केली होती. ४५ वर्षीय अभिनेत्री राईमा इस्लाम शिमूने १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बार्तामान’ या बंगाली चित्रपटातून पदार्पण केले होते. राईमाने आतापर्यंत २५ चित्रपटांत काम केले असून अनेक टीव्ही शोमध्येही अभिनय केला आहे. राईमा बांग्लादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशन या संस्थेचीही सदस्य होती.