ओबामांचा खुलासा, अल कायद्याशी आहे पाकिस्तानचे नाते

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 17, 2020 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

barak obama: नवीन पुस्तक ‘A Promised Land’मद्ये जगातील सर्वात मोठ्या दहशतवद्याला मारण्याबाबत ओबामा यांनी खुलासा केला आहे.

barak obama
ओबामांचा खुलासा, अल कायद्याशी आहे पाकिस्तानचे नाते 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षांनी लादेनला मारण्याच्या विविध पर्यायांचे वर्णन या पुस्तकात केले आहे
  • संपूर्ण सरकारमध्ये केवळ मूठभर लोकांना या ऑपरेशनची माहिती होती.
  • पाकिस्तानचे सैन्य आणि विशेष म्हणजे त्यांची गुप्तचर एजन्सी तालिबानशी संपर्कात होती

मुंबई: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा(america former president barak obama)  यांनी पाकिस्तानातल(pakistan) लपलेला दहशतवादी ओसामा बिन लादेन(osama bin laden) आणि तेथील सैन्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ओबामा म्हणाले, त्यांनी ओसामा बिन  लादेनच्या ठिकाण्यावर छापा मारताना पाकिस्तानला सामील करण्यास नकार दिला होता, कारण हे एक खुलेस रहस्य होते की पाकिस्तानचे सैन्य आणि विशेष म्हणजे त्यांची गुप्तचर एजन्सी तालिबानशी संपर्कात होती आणि याचा उपयोग कधी कधी अफगाणिस्तान आणि भारत करत होते.  

एबटाबादमधील हल्ल्याची माहिती देत आपल्या नवीन पुस्तक ‘A Promised Land’मद्ये जगातील सर्वात मोठ्या दहशतवद्याला मारण्याबाबत ओबामा यांनी खुलासा केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तत्कालीन संरक्षण मंत्री सचिव रॉबर्ट गेट्स आणि माजी उपाध्यक्ष जो बायडेन, जे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी या ऑपरेशनला विरोध केला होता.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षांनी लादेनला मारण्याच्या विविध पर्यायांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. हे स्पष्ट झाले होते की अल कायद्याचा प्रमुख एबटाबादमध्ये एका पाकिस्तानी छावणीच्या बाहेर सुरक्षित जागेत राहत होता. त्यांनी लिहिले की, मी जे ऐकले, त्याच्या आधारावर ठरवले की आपल्याकडे कंपाऊंडरवर हल्ल्यासाठी माहिती आहे. जेव्हा सीआयए टीम त्याच्या ओळखीबाबत काम करत होती तेव्हा मी टॉम डोनिलन आणि जॉन बिडेन यांना विचारले की छापा कसा असेल?

यासाठी गुप्तता खूप महत्त्वाची होती. कारण लादेनला थोडीशी जरी चाहूल लागली असती तर आम्ही आमची संधी गमावली असती. संपूर्ण सरकारमध्ये केवळ मूठभर लोकांना या ऑपरेशनची माहिती होती. त्यांनी पुढे लिहिले, आमच्या आणखी एक समस्या होती ती म्हणजे या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानला सामील न करणे. एबटाबादमध्ये आम्ही जे काही निवडले आहे त्यातील शक्यता म्हणजे एका सहकाऱ्याच्या क्षेत्राचे उल्लंघन करणे. युद्धात राजकीय डाव आणि परिचालन जटिलता दोन्ही वाढतात. 

अखेरीस आम्ही दोन पर्यायांवर चर्चा केली. यातील पहिला हवाई हल्ल्याने उद्ध्वस्त करणे. दुसरा विशेष ऑप्श मिशनला अधिकृत करणे होते यात एका निवडलेली टीम हेलिकॉप्टरच्या मदतीने पाकिस्तानात जाईल, परिसरात छापा मारेल आणि  प्रतिक्रिया करण्यासाठी पाकिस्तानी पोलीस अथवा सैन्याकडे जाण्याआधी बाहेर पडेल. सर्व जोखीम असताना ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमने दुसरा पर्याय निवडला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी