Cheap Petrol-Diesel : स्वस्त पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅससाठी भारत रशियासोबत करणार 'हा' करार?

Barter System Of Old Time Can Be A Good Option For India To Get Cheap Petrol-Diesel : अमेरिका आणि अमेरिकेचे समर्थक असलेल्या अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमधून वाट काढण्यासाठी रशिया भारताला सवलतीच्या दरात पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅसची विक्री करण्यास उत्सुक आहे.

Barter System Of Old Time Can Be A Good Option For India To Get Cheap Petrol-Diesel
Cheap Petrol-Diesel : स्वस्त पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅससाठी भारत रशियासोबत करणार 'हा' करार? 
थोडं पण कामाचं
  • स्वस्त पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅससाठी भारत रशियासोबत करणार 'हा' करार?
  • रुपया-रुबल अथवा प्राचीन देवाणघेवाण (अदलाबदली अथवा बार्टर सिस्टिम) या दोन पद्धतींपैकी एखादी पद्धत वापरण्याची शक्यता
  • रशियाच्या निमित्ताने भारताला मोठी संधी

Barter System Of Old Time Can Be A Good Option For India To Get Cheap Petrol-Diesel : नवी दिल्ली : अमेरिका आणि अमेरिकेचे समर्थक असलेल्या अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमधून वाट काढण्यासाठी रशिया भारताला सवलतीच्या दरात पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅसची विक्री करण्यास उत्सुक आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा यशस्वी झाल्यास भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅस खरेदी करणार आहे. खरेदी व्यवहार करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लवकरच लेखी करार होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

भारत आणि रशिया एकमेकांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी रुपया-रुबल अथवा प्राचीन देवाणघेवाण (अदलाबदली अथवा बार्टर सिस्टिम) या दोन पद्धतींपैकी एखादी पद्धत वापरण्याची शक्यता आहे. जर रुपया-रुबल असे ठरले तर दोन्ही देश एकमेकांची चर्चा करून आपापल्या चलनांचे मूल्य निश्चित करतील. यानंतर भारत आयात करताना रशियाला रुपयांच्या स्वरुपात पैसे देईल तर रशिया भारतातून खरेदी केलेल्या उत्पादन आणि सेवांसाठीचे पैसे रुबलच्या स्वरुपात भारताला देईल. जर प्राचीन देवाणघेवाण पद्धतीने व्यवहार करण्याचा निर्णय झाला तर रशियाच्या कोणत्या वस्तूची किती मागणी नोंदविल्यास भारताची कोणती वस्तू त्या बदल्यात रशियाला द्यायची हे ठरवले जाईल. यानंतर व्यवहार पूर्ण केला जाईल. यामुळे दोन्ही देशांना त्यांच्या उपयुक्ततेच्या वस्तू आणि सेवा एकमेकांकडून घेणे शक्य होईल. यातील देवाणघेवाण पद्धतीऐवजी रुपया-रुबल पद्धतीने व्यवहार होण्याची शक्यता जास्त आहे. 

रशियाकडे पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅस यांचा मोठा साठा आहे. यामुळे भारत कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणात रशियाकडून खरेदी करून देशातील ऊर्जास्रोतांचे दर नियंत्रणात ठेवण्याची तसेच दीर्घकालीन ऊर्जास्रोतांची गरज पूर्ण करण्याची शक्यता आहे. 

भारत प्रामुख्याने अमेरिका, चीन तसेच आखाती देशांना निर्यात करतो. रशियात भारताकडून निर्यातीचे प्रमाण कमी आहे. शस्त्रांच्या निमित्ताने भारत रशियाकडून मागील अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. पण पाश्चात्यांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाने भारताला गुंतवणुकीचे आमंत्रण दिले आहे. यामुळे भारताच्या औषध उद्योग, स्टील उद्योग, लोखंड आणि पोलाद उद्योग, दूरसंचार उद्योग, चहा उद्योग, रसायने उद्योग अशा अनेक उद्योगांना मोठी संधी चालून आली आहे. 

भारताने ऐन कोरोना संकटात २०२१ मध्ये रशियाला ३.३३ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. याउलट भारताने रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने, मोती, सेमी प्रीशियस स्टोन, कोळसा, खते, वनस्पती तूप अशा अनेक वस्तू आयात केल्या होत्या. 

उपलब्ध आकडेवारीनुसार रशियाला सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका हा देश २०१९ मध्ये चाळीसाव्या स्थानावर होता. अमेरिका हा देश रशियाला सुमारे सहा अब्ज डॉलर एवढी निर्यात करत होता. आता अमेरिका आणि पाश्चात्य देश रशियाला ज्या वस्तू आणि सेवा पुरवत होते त्या पुरवण्याची जबाबदारी भारतीय कंपन्यांनी उचलली तर भारतात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भर पडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी