ऑर्डर केलेल्या पराठ्यामध्ये आढळली सापाची कात, नेदुमनगडमधील हॉटेलवर कारवाई

ग्राहकांनो तुम्ही हॉटेलवर जाऊन जेवण करत असाल तर सावधान. कारण केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीच्या पराठ्यामध्ये चक्क सापाची कात आढळून आली आहे. या घटनेमुळे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणाऱ्यांच्या मनात धसका घेतला आहे.

Snake skin found in ordered paratha
ऑर्डर केलेल्या पराठ्यामध्ये आढळली सापाची कात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सापाची कात ही अन्न पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरमध्ये होती.
  • स्वयंपाकघरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नव्हती आणि बाहेर कचरा टाकलेला दिसला. यामुळे आउटलेट तात्काळ बंद करण्यात आलं

तिरुअनंतपुरम : ग्राहकांनो तुम्ही हॉटेलवर जाऊन जेवण करत असाल तर सावधान. कारण केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीच्या पराठ्यामध्ये चक्क सापाची कात आढळून आली आहे. या घटनेमुळे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणाऱ्यांच्या मनात धसका घेतला आहे.  दरम्यान केरळच्या (Kerala) तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) नेदुमनगड (Nedumangad) येथील एक हॉटेल (Hotel) अन्न सुरक्षा (Food security) अधिकाऱ्यांनी तात्पुरतं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ५ मे रोजी एका महिलेने चंदमुक्कूच्या दुकानातून पराठा मागवला होता. यात सापाची कात आढळली. तिरुवनंतपुरम येथील अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितलं की, घटनेची नोंद झाल्यानंतर हॉटेल तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया नावाच्या महिलेने आणि तिच्या मुलीने जेवणासाठी दोन पराठे विकत घेतले होते, त्यापैकी एक मुलीने खाल्ला आणि आईने दुसरा पराठा खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला पार्सलवर सापाच्या कातीचा ​​एक भाग सापडला. त्यानंतर या महिलेने पोलिसांना याची माहिती दिली आणि नंतर प्रकरण अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यांनी हॉटेलची पाहणी करून ते बंद करण्याचे आदेश दिले.'आम्ही हॉटेलची तात्काळ पाहणी केली. तिथे अतिशय खराब स्थितीत जेवण बनवलं जात होतं. स्वयंपाकघरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नव्हती आणि बाहेर कचरा टाकलेला दिसला. यामुळे आउटलेट तात्काळ बंद करण्यात आलं आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आमच्या प्राथमिक निष्कर्षानुसार सापाची कात ही अन्न पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरमध्ये होती. इथे वृत्तपत्राचा वापर अन्न पॅक करण्यासाठी केला जात होता' अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अर्शिता बशीर, यांनी दिली.

कासारगोड जिल्ह्यातील एका भोजनालयातील अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 308 आणि 272 (भेसळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी