हैवानियत! १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत असा क्रूरपणा, ऐकून पाय खालची जमीन सरकेल..

SEXUAL ASSAULT : माणुसकीला लाजवेल अशी घटना आंध्र प्रदेशात समोर आली आहे. कोरोनाच्या लाटेत नुकतीच आई गमावलेल्या १३ वर्षीय मुलीवर आठ महिने सतत सामूहिक बलात्कार करण्यात आला. या महिन्यांत 80 हून अधिक लोकांनी तिचे लैंगिक शोषण केले.

Beast! Hearing such cruelty with a 13-year-old girl, the ground will slip under her feet.
हैवानियत! १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत असा क्रूरपणा, ऐकून पाय खालची जमीन सरकेल..  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंध्र प्रदेशातून क्रूरतेची एक भयानक घटना समोर आली आहे.
  • गुंटूरमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 80 जणांनी बलात्कार केला. 
  • मुलीने तिच्यासोबत झालेल्या छळाची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली.

हैद्राबाद : महिलांविरोधातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कायदा कडक करण्याची मोहीम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक बदलही झाले आहेत, पण महिलांविरुद्धच्या वेदनादायक घटना समोर येत आहेत. पुन्हा एकदा 13 वर्षांच्या निष्पाप मुलीला एक-दोन नव्हे तर 80 जणांनी लैंगिक शोषणाची शिकार बनवलं आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 74 आरोपींना अटक केली आहे. (Beast! Hearing such cruelty with a 13-year-old girl, the ground will slip under her feet.)

अधिक वाचा : Indian Railways : रिझर्व्हेशन असूनही नाही मिळाली सीट, रेल्वेला १४ वर्षांनंतर १ लाखाचा दंड

आठ महिन्यांत अनेकदा बलात्काराच्या घटना 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 13 वर्षांच्या मुलीला गेल्या आठ महिन्यांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील वेगवेगळ्या वेश्यालयात पाठवण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात सुमारे 80 जणांना आरोपी बनवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

अधिक वाचा : Corona Update : राजधानीत पुन्हा मास्क है जरुरी !, नियम मोडल्यास ५०० रुपये दंड; शाळांसाठी जारी केला जाईल SOP

74 अटक

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी 10 आरोपींना अटक केली. यासह गुंड, दलाल आणि ग्राहकांसह अटक केलेल्या आरोपींची संख्या 74 झाली आहे.

अनाथ म्हणून दत्तक घेतले, नंतर विकले

या मुलीची कहाणी एवढी वेदनादायी आहे की, ऐकणाऱ्यांनाही रडू येऊ शकते. बातमीनुसार, पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीला एका महिलेने दत्तक घेतले होते. वास्तविक, जून 2021 मध्ये मुलीच्या आईला कोरोना झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची मुलीच्या आईशी मैत्री होती. कोविड-19 मुळे मुलीच्या आईचा मृत्यू झाला आणि मुख्य आरोपी स्वरण कुमारीने तिला दत्तक घेतले. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. ऑगस्ट 2021 मध्ये, मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी कारवाई केली आणि मुलीचा शोध घेतला. या प्रकरणातील सहा आरोपी फरार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी