Bengal SSC scam : पार्थ चटर्जींची मंत्रिपदावरून हकालपट्टी

Bengal SSC scam : Mamta Banerjee sacks Partha Chatterjee from cabinet : पश्चिम बंगाल सरकारचे कॅबिनेट मंत्री पार्थ चटर्जी यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. पार्थ चटर्जी यांच्याकडून मंत्रिपदाचा सर्व कारभार काढून घेण्यात आला आहे.

Bengal SSC scam : Mamta Banerjee sacks Partha Chatterjee from cabinet
Bengal SSC scam : पार्थ चटर्जींची मंत्रिपदावरून हकालपट्टी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Bengal SSC scam : पार्थ चटर्जींची मंत्रिपदावरून हकालपट्टी
  • पार्थ चटर्जी यांच्याकडून मंत्रिपदाचा सर्व कारभार काढून घेण्यात आला
  • पार्थ चटर्जी यांच्यावरील कारवाईमुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदांचा कारभार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः हाताळणार

Bengal SSC scam : पश्चिम बंगाल सरकारचे कॅबिनेट मंत्री पार्थ चटर्जी यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. पार्थ चटर्जी यांच्याकडून मंत्रिपदाचा सर्व कारभार काढून घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत पार्थ चटर्जी यांच्यावरील कारवाईमुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदांचा कारभार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः हाताळणार आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये पार्थ चटर्जी शिक्षणमंत्री असताना त्यांच्या खात्याने शिक्षक भरती केली. या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. ईडीने तपास सुरू केला. पार्थ चटर्जी यांच्या विश्वासू आणि बंगाली अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या दोन घरांवर ईडीने धाड टाकली. या धाडींमधून ईडीने कोट्यवधींची रोकड आणि सोन्याचा मोठा साठा जप्त केला. ईडीने मुखर्जी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, रोकड आणि सोनं जप्त केले. यानंतर पार्थ चटर्जी यांच्याशी संबंधित आणखी काही जणांची कसून चौकशी सुरू झाली. परिस्थितीचा अंदाज येताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पार्थ चटर्जी यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. 

याआधी पार्थ चटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने केली होती. भाजपने कोलकाता येथे एक मोर्चा काढून पार्थ चटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवावे यासाठी आग्रही मागणी केली. अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त झालेली रोकड आणि सोनं यामुळे पार्थ यांच्या अडचणी आणखी वाढल्या. कारण अर्पिता या पार्थ चटर्जी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात ओळखल्या जात होत्या. अर्पिता यांच्या घरात शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत पाकिटांमधून कोट्यवधींची रोख रक्कम ठेवल्याचे आढळले. यामुळेच पार्थ यांच्या विरोधात कारवाईसाठीचा दबाव वाढला. अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कारवाई केली. 

मंत्रिपदावरून हटवले तरी पार्थ चटर्जी अद्याप तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षातून त्यांची हकालपट्टी झालेली नाही. यामुळे विरोधक पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकार विरोधात एकजूट होण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी