Banglore CAA Protest: आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांचा अनोखा अंदाज

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 20, 2019 | 17:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बंगळुरूतील टाउन हॉलमध्ये लोकांनी एकत्र येत विरोध केला. मात्र काही वेळानंतर तिथे गर्दी वाढल्याने गदारोळ माजला. त्यावेळी बंगळुरूचे डीसीपी चेतन सिंह राठोड यांनी एक वेगळी शक्कल लढवली.

Banglore CAA Protest: आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांचा अनोखा अंदाज
Bengaluru dcp sings national anthem to control caa protesters  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • डीसीपी चेतन सिंह राठोड विरोधप्रदर्शन करणाऱ्यांना टाउन हॉल रिकामा करण्यास सांगत होते.
  • त्यानंतर डीसीपी साहेबांनी चक्क राष्ट्रगीत जन गण मन म्हणण्यास सुरूवात केली.
  • राष्ट्रगीत संपल्यानंतर मात्र प्रत्येक जण टाउन हॉलमधून शांततेत बाहेर पडू लागला.

बंगळुरू: कोणी समोरून चिडलेला व्यक्ती आपले काहीच ऐकत नसेल तर तुम्ही शांत करण्यासाठी काय कराल, अर्थात त्याच्याप्रमाणे न चिडता शांततेत त्याला उत्तर देत गोष्ट चिघळू देणार नाही. असाच अंदाज दाखवला आहे बंगळुरू सेंट्रलचे डीसीपी चेतन सिंह राठोड यांनी. सध्या ठिकठिकाणी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोनलं, निदर्शने सुरू आहेत. अशावेळी आंदोलनकर्ते भडकल्यावर ते कोणाचेही ऐकत नाही. त्यांना शांत करण्यासाठी पोलीस यंत्रणा जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. मात्र बंगळुरूच्या या डीसीपीने चांगलीच शक्कल लढवली.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभरात तणावाचे वातावरण आहे. मात्र यामध्ये अफवाही परवल्या जात आहेत. रस्त्यावर उतरत जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत, त्यापैकी अनेकांना हा कायदा नक्की काय आहे याची माहितीच नाही. त्यांच्या विरोधाचे एक कारण ते म्हणजे देशाचे संविधान अडचणीत आहे. यासाठीच बंगळुरूतील टाउन हॉलमध्ये लोकांनी एकत्र येत विरोध केला. मात्र काही वेळानंतर तिथे गर्दी वाढल्याने गदारोळ माजला. त्यावेळी बंगळुरूचे डीसीपी चेतन सिंह राठोड यांनी एक वेगळी शक्कल लढवली.

डीसीपी चेतन सिंह राठोड विरोधप्रदर्शन करणाऱ्यांना टाउन हॉल रिकामा करण्यास सांगत होते. मात्र कोणीही त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते. त्यावेळी त्यांनी या लोकांना मी एक गाणं गाणार असल्याचे सांगितले. आणि यासाठी तुम्हीदेखील माझी साथ द्या असे आवाहन केले. विरोधप्रदर्शन करणाऱ्या प्रत्येकाने होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर डीसीपी साहेबांनी चक्क राष्ट्रगीत जन गण मन म्हणण्यास सुरूवात केली. मग काय, सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांच्यासोबत राष्ट्रगीत म्हणू लागले. आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर मात्र प्रत्येक जण टाउन हॉलमधून शांततेत बाहेर पडू लागला.

डीसीपी साहेबांचा हा व्हिडिओ सध्या ट्विटर तसेच सर्व ठिकाणी व्हायरल होत आहे. एकीकडे विरोधप्रदर्शन करणाऱ्यांना थांबवताना पोलीसही जखमी होत होते, मात्र दुसरीकडे डीसीपी चेतन सिंह राठोड यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. या पद्धतीने देखील आंदोलनकर्त्यांना समजावले जाऊ शकते असे लोकांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये आंदोलनकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत दोन जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे नंतर तिथे कर्फ्यू लावला गेला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी