Best Honeymoon Places: हनीमूनसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणं, स्वस्त आणि रोमँटिक!

हनीमूनमध्ये पर्यटन हा महत्त्वाचा भाग नसतो, तर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम जागा आणि वातावरण असणं आवश्यक असतं. भारतातील काही ठिकाणं ही हनीमूनसाठी उत्तम मानली जातात. या ठिकाणांची सहल स्वस्तात होऊ शकते आणि जोडप्यांना हवं असणारं वातावरणही तिथे मिळू शकतं.

Best Honeymoon Places
हनीमूनसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हनीमूनसाठी योग्य जागेचा पर्याय निवडणे आवश्यक
  • अनेक ठिकाणे आहेत स्वस्त आणि रोमँटिक
  • बहुतांश ठिकाणे उत्तर भारतात

Best Honeymoon Places: लग्नानंतर हनीमूनला (Honeymoon) जाणे, हा कुठल्याही जोडप्यासाठी महत्त्वाचा अनुभव असतो. हनीमूनच्या काळात जोडपी एकमेकांना जवळून समजून घेऊ शकतात आणि आपल्या वैवाहिक आयुष्याची (Married Life) चांगली सुरुवात करू शकतात. लग्न ठरल्यानंतर लगेचच हनीमूनला जाण्याच्या ठिकाणाचा विचार सुरू होतो आणि त्याचं प्लॅनिंग केलं जातं. मात्र अनेकदा कपल्सकडून हनीमूनसाठी चुकीच्या ठिकाणांची निवड केली जाते. हनीमूनमध्ये पर्यटन हा महत्त्वाचा भाग नसतो, तर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम जागा आणि वातावरण असणं आवश्यक असतं. भारतातील काही ठिकाणं ही हनीमूनसाठी उत्तम मानली जातात. या ठिकाणांची सहल स्वस्तात होऊ शकते आणि जोडप्यांना हवं असणारं वातावरणही तिथे मिळू शकतं. जाणून घेऊया भारतातील अशाच काही ठिकाणांविषयी. 

उटी

भारतात हनीमूनसाठी उटी हे सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. डोंगरदऱ्यांनी सजलेलं उटी अनेक अद्भूत नैसर्गिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या निलगिरीच्या डोंगरदऱ्यांमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात आणि आरामात वेळ घालवू शकता. विशेष म्हणजे कुठल्याही ऋतुत तुम्ही इथं जाऊ शकता.

  • उटीत हनीमूनसाठी एका दिवसाचा खर्च साधारण 2500 ते 3500 रुपये
  • उटीत राहण्यासाठी स्वस्तातील हॉटेलपासून महागड्या अलिशान हॉटेलपर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध
  • नदी, ओहोळ, झरे, धबधबे, बॉटनिकल गार्डन यासारखी अनेक नयनरम्य ठिकाणं

धर्मशाला

जर तुम्ही हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर कुल्लू-मनालीव्यतिरिक्त धर्मशाला हे एक उत्तम ठिकाण आहे. कुलू-मनालीपेक्षा हे चांगलं आणि रोमँटिक ठिकाण मानलं जातं. 

अधिक वाचा - Mughal Food : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा होता भर

  • धर्मशालात एका दिवसाचा खर्च साधारण 3000-4000
  • अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि लोकेशन्स
  • भाग्सू फॉल्स, युद्ध स्मारक, नामग्याल मठ, मसरूर रॉक कट मंदिर आणि दलाई लामा मंदिर ही विशेष आकर्षणं

नैनिताल

उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय आहेत. पण तुम्ही स्वस्त आणि रोमँटिक जागेच्या शोधात असाल, तर नैनिताल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीवर असणारं हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यानं संपन्न आहे. दिल्ली, हरयाणा, पंजाब या ठिकाणांहून तुम्ही सहज नैनितालला पोहोचू शकता. 

अधिक वाचा - Vastu Tips For Wall Clock: घरात 'या' दिशेला लावा घड्याळ, नशीब चमकायला लागणार नाही वेळ

  • नैनीतालमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचा खर्च साधारण 2500-3500 रुपये
  • नौका विहार, इको केव्ह गार्डन, टिफिन टॉप, मॉल रोड, स्नो व्ह्यू पॉइंट आणि नैना देवी मंदिर ही उत्तम ठिकाणं

जैसलमेर

जर तुम्ही राजस्थानमधील एखाद्या ठिकाणी हनीमूला जाण्याचा विचार करत असाल, तर जैसलमेरचा नक्की विचार करा. गोल्डन सिटी या नावाने प्रसिद्ध असणारं हे ठिकाण नव्या सहजीवनाची सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे. 

  • जैसलमेरमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचा खर्च साधारण 3500-4500 रुपये
  • जैसलमेर किल्ला, बडा बाग, पटवों की हवेली, गडिझर झरा, जैन मंदिर असे अनेक पर्याय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी