Covid Variant BF.7 : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा आणि जगाची चिंता वाढवणारा कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट आणि त्याची लक्षणे

BF.7 coronavirus variant, covid variant bf.7 symptoms coronavirus cases in india : चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढत आहे. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणि हॉस्पिटलमध्ये बेडसाठी वेटिंग आहे.

BF.7 coronavirus variant
चीनमध्ये धुमाकूळ घालणारा जगाची चिंता वाढवणारा BF.7 व्हेरिएंट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • चीनमध्ये धुमाकूळ घालणारा आणि जगाची चिंता वाढवणारा कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट
 • चीनच्या मंगोलिया प्रांतात BF.7 चा रुग्ण आढळला
 • BF.7 विषाणूचा संसर्ग झाल्यास आढळणारी प्रमुख लक्षणे

BF.7 coronavirus variant, covid variant bf.7 symptoms coronavirus cases in india : चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढत आहे. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणि हॉस्पिटलमध्ये बेडसाठी वेटिंग आहे. अंत्यसंस्कारासाठी ठिकठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक कोरोना रुग्णांचे नातलग बेड मिळावा यासाठी धावपळ करत आहेत. औषधांची कमतरता भासत आहे. चीनमध्ये नव्या वर्षात (2023) कोरोनामुळे किमान 10 लाख मृत्यू होतील असा प्राथमिक अंदाज आहे. 

वैज्ञानिकांच्या ताज्या अहवालानुसार चीनमध्ये BF.7 या कोरोना विषाणूच्या अवताराची बाधा लाखो नागरिकांना वेगाने होत आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे जेवढे अवतार कळले आहेत त्यापैकी हा अवतार सर्वाधिक वेगाने संसर्ग पसरणारा आहे. याच कारणामुळे चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढत आहे. 

BF.7 या कोरोना विषाणूच्या अवताराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये विशिष्ट प्रकारचे म्युटेशन झाले आहे. यामुळे BF.7 याची बाधा झालेल्या शरीरात वेगाने अँटीबॉडी (रोगप्रतिकारक क्षमता) विकसित होत नाहीत. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशांना BF.7 या कोरोना विषाणूची बाधा होण्याचा मोठा धोका आहे. 

एखाद्या व्यक्तीला BF.7 या कोरोना विषाणूची बाधा झाली तर ती व्यक्ती आणखी किमान 15 ते 20 जणांना याच विषाणून बाधीत करू शकते. यामुळे BF.7 चा संसर्ग वेगाने पसरत आहे. 

चीनच्या मंगोलिया प्रांतात BF.7 चा रुग्ण आढळला. नंतर अवघ्या काही दिवसांत संपूर्ण चीनमध्ये BF.7 ने बाधीत रुग्ण आढळू लागले. आता चिनी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये या विषाणूने बाधीत रुग्ण आढळत आहेत. अमेरिका, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्कमध्ये BF.7 ने बाधीत रुग्ण आढळले आहेत.

भारतात सप्टेंबर 2022 मध्ये अमेरिकेतून गुजरातमधील बडोद्यात आलेल्या महिलेला BF.7 ची बाधा झाल्याचे आढळले होते. पण वेळीच खबरदारी घेतल्यामुळे भारतात त्यावेळी BF.7 पसरला नव्हता. संबंधित महिला आणि तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाइन करण्यात आले होते. यामुळे संकट टळले होते. मात्र आता चीनमध्ये BF.7 विषाणूचा संसर्ग पसरत आहे. भारत सरकारने चीनमधील परिस्थिती बघून देशांतर्गत खबरदारीचे उपाय करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

तब्येत बिघडल्यास नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांकडे जाताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा अशा स्वरुपाचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये असेही आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

करिअरमध्ये एकही सिक्स न मारलेले बॅटर

फलंदाज किती प्रकारे होऊ शकतो आऊट

BF.7 विषाणूचा संसर्ग झाल्यास आढळणारी प्रमुख लक्षणे :

 1. श्वास घेण्यास त्रास होणे
 2. दम लागणे
 3. थकवा येणे
 4. ताप येणे
 5. वारंवार खोकला येणे
 6. घसा खवखवणे
 7. नाक वाहणे (सर्दी)
 8. छातीत दुखणे
 9. पोटात दुखणे
 10. थंडी वाजणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी