पत्नीला शिकवून पोलीस बनवणाऱ्या पतीची कैफियत, पत्नी म्हणते नांदायचं नाही

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 14:39 IST | टाइम्स नाऊ हिंदी

भोपाळच्या बैरसिया भागातील एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनलंय. एका पुजाऱ्यानं पूजा-पाठ करून आपल्या पत्नीला शिकवून पोलीस उप-निरीक्षक बनवलं. पत्नीला सरकारी नोकरी लागल्याबरोबर तिला आता आपल्या पतीबरोबर राहायचं नाही.

women police
पत्नीला शिकवणाऱ्या पतीची कैफियत  |  फोटो सौजन्य: Representative Image

भोपाळ : सध्या देशामध्ये अशीही प्रकरणं समोर येत आहेत ज्यात शिकून सवरून अधिकारी बनलेल्या बायका नवऱ्यांपासून घटस्फोट घेत आहेत. असंच एक प्रकरण भोपाळच्या बैरसिया विभागामध्ये घडलं आहे. एका पुजाऱ्यानं आपल्या पत्नीला उत्तम शिक्षण दिलं. तिला शिकवून पोलीस उप-निरीक्षक बनवलं आणि जेव्हा तिला सरकारी नोकरी लागली तेव्हा पत्नीचं वागणंच बदललं.

पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर पत्नीनं तिच्या नवऱ्याबरोबर राहण्यास चक्क नकार दिला. बायकोच्या म्हणण्यानुसार ती नवऱ्याला आपल्या घरी ठेवू शकत नाही कारण त्याची लायकी नाही. हे प्रकरण जिल्हा सेवा कायदेशीर प्राधिकरणा समोर आलं आहे. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार त्याची बायको लग्नाआधी कोणत्याही प्रकारची नोकरी करत नव्हती. मी तिला शिकवण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. पैसे कमावले आणि भोपाळमध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं. तिला घरातलं कोणतंही काम करू दिलं नाही, फक्त तिला अभ्यास करायला लावला. पण तीन वर्षांनी आता जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे, तर तिला आता माझ्याबरोबर नांदायचं नाही.

सध्या त्याच्या पत्नीची पोस्टिंग इंदूरमध्ये पोलीस उप-निरीक्षक म्हणून झाली आहे. नोकरी लागल्यानंतर पत्नीनं पतीच्या हातात घटस्फोटाचा अर्ज दिला. समुपदेशन करतांना पत्नीनं सांगितलं की पतीची माझ्याबरोबर राहण्याची लायकी नाही. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांना समजावून त्यांचं समुपदेशन केलं जात आहे. काही दिवसांपासून अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये बायका उच्च पदांवर पोहोचल्यावर आपल्या नवऱ्यांना घटस्फोट देत आहेत.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील आणखी एक घटस्फोटाचं प्रकरण चर्चेचा विषय ठरलं होतं. पण त्यात पत्नीनं पतीकडे घटस्फोट मागण्याचं कारण वेगळंच होतं. तिचा नवरा आठ-आठ दिवस आंघोळ दाढी करत नाही म्हणून तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यातील जोडपं अतिशय कमी वयाचं म्हणजेच २३-२४ वर्षांचं होतं. दोघांचा प्रेमविवाह झाला होता, तो ही आंतरजातीय. पती सिंधी समाजाचा तर पत्नी ब्राह्मण समाजाची होती. त्यांच्या घटस्फोटाला कोर्टानं मंजुरी देत सहा महिने विभक्त राहिल्यानंतर अधिकृतपणे घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं.

असेच काही प्रकरणं सध्या देशात बघायला मिळत आहेत. कुठे पती-पत्नींमधील आर्थिक, सामाजिक तफावत बरेचदा या घटस्फोटासाठी कारणीभूत ठरतेय.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पत्नीला शिकवून पोलीस बनवणाऱ्या पतीची कैफियत, पत्नी म्हणते नांदायचं नाही Description: भोपाळच्या बैरसिया भागातील एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनलंय. एका पुजाऱ्यानं पूजा-पाठ करून आपल्या पत्नीला शिकवून पोलीस उप-निरीक्षक बनवलं. पत्नीला सरकारी नोकरी लागल्याबरोबर तिला आता आपल्या पतीबरोबर राहायचं नाही.
Loading...
Loading...
Loading...