कोरोना लसीकरणात चिमुकल्या भूतानची चमकदार कामगिरी

कोरोना लसीकरणच्या मोहिमेत चिमुकल्या भूतान या देशाने अतिशय चमकदार कामगिरी केली.

bhutan vaccinate its entire adult population in a few days
कोरोना लसीकरणात चिमुकल्या भूतानची चमकदार कामगिरी 

थोडं पण कामाचं

  • कोरोना लसीकरणात चिमुकल्या भूतानची चमकदार कामगिरी
  • वेळेवर लसीकरण सुरू करुन भूतानने मोठे संकट टाळले
  • भारताने ७.६३ लाख लोकसंख्येच्या भूतानला लसीकरणासाठी मोठी मदत दिली

थिंफू: कोरोना लसीकरणच्या मोहिमेत चिमुकल्या भूतान या देशाने अतिशय चमकदार कामगिरी केली. भारत आणि चीन या दोन मोठ्या देशांच्या सीमांना लागून असलेल्या भूतानमध्ये कोरोना संकटाने शिरकाव केला. कोरोनामुळे भूतानसमोर आव्हान निर्माण झाले होते. पण वेळेवर लसीकरण सुरू करुन भूतानने मोठे संकट टाळले. bhutan vaccinate its entire adult population in a few days

भारताने ७.६३ लाख लोकसंख्येच्या भूतानला लसीकरणासाठी मोठी मदत दिली. भारत सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस भूतानला मिळाली. यानंतर भूतानने तातडीने लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. भूतानने मागील नऊ दिवसांमध्ये चार लाख ६६ हजार ८११ जणांना लस टोचली. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांपैकी ८५ टक्के नागरिकांना लस देण्याचे काम भूतानने पूर्ण केले. यामुळे भूतानच्या एकूण लोकसंख्येपैकी ६२ टक्के नागरिकांना लस मिळाली. 

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसच्या माध्यमातून भूतानमध्ये लसीकरण सुरू आहे. पहिला डोस घेतलेल्यांना आठ ते बारा आठवड्यांनंतर दुसरा डोस देण्याचा निर्णय भूतानने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर २७ मार्च २०२१ पासून भूतानने लसीकरण मोहीम सुरू केली. आतापर्यंत भूतानच्या एकूण लोकसंख्येपैकी ६२ टक्के नागरिकांना कोविशिल्ड लसचा पहिला डोस देण्यात आला. 

भूतानमधील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी भारतातून लसची खेप लवकरच रवाना होणार आहे. भूतान सरकारने नागरिकांना मास्क घालणे, सोशल डिस्टंस राखणे आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेला भूतानच्या नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

भूतानमध्ये ३७ डॉक्टर आणि ३००० हजार पूर्णवेळ आरोग्य सेवक आहेत. लष्कराच्या जवानांसाठी असणारे बूट स्वयंसेवकांना देण्यात आले. यामुळे दुर्गम ठिकाणी पोहोचणे आरोग्य सेवकांना शक्य झाले. प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नसती तर गावांमध्ये लस पोहचवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला असता. पण सर्व नियोजन व्यवस्थित करुन लसचा व्यवस्थित वापर करुन भूतान सरकारने अल्पावधीत जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी