गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसला मोठा धक्का, संध्याकाळपर्यंत 11 पैकी 9 ते 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

देशातील आणखी एका राज्यातील राजकारणातील (Politics) भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मोठा भूकंप आला. महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) पक्षानंतर  आता गोव्यातील (Goa) काँग्रेस पक्ष (Congress) धोक्यात आहे.

 By evening, 9 to 10 MLAs out of 11 will join BJP
संध्याकाळपर्यंत 11 पैकी 9 ते 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सायंकाळपर्यंत 9 ते 10 आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
  • गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे.
  • काँग्रेस आमदारांना भाजपात प्रवेश देण्यासाठी भाजप श्रेष्ठींकडून हिरवा कंदील

पणजी : देशातील आणखी एका राज्यातील राजकारणातील (Politics) भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मोठा भूकंप आला. महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) पक्षानंतर  आता गोव्यातील (Goa) काँग्रेस पक्ष (Congress) धोक्यात आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून काँग्रेस आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि अपक्ष अशा 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातही राजकीय भूकंप होणार आहे. काँग्रेसचे 11 पैकी 9 ते 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Read Also : भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी, पैसे असलेली बॅग

भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून सायंकाळपर्यंत 9 ते 10 आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Read Also : 2050पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिकच लागेल गळाला

 गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी