नाव उलटून मोठी दुर्घटना; १० जण बुडाले, एकाच परिवारातील सात जणांचा समावेश

Boat capsizes: एक मोठी दुर्घटना घडली आहे. धरणात अचानक नाव उलटल्याने १० जण बुडाल्याचं वृत्त समोर येत आहे. 

big breaking boat capsize at Koderma in Jharkhand fear of 10 people drowned
नाव उलटून मोठी दुर्घटना; १० जण बुडाले, एकाच परिवारातील सात जणांचा समावेश 
थोडं पण कामाचं
  • झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील घटना
  • पंचखेरो डॅममध्ये नाव उलटली, मदत आणि बचावकार्य सुरू
  • नाव उलटल्याने १० जण बुडाले, एकाच परिवारातील सात जणांचा समावेश

कोडरमा : झारखंड (Jharkhand) मधून एक मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर आली आहे. कोडरमा जिल्ह्यातील पंचखेरो डॅममध्ये एक नाव उलटली (boat capsized) आहे. या नावमध्ये एकूण १० जण प्रवास करत होते आणि सर्वच्या सर्व नागरिक बुडाले आहेत. नाव उलटल्याचं वृत्त समोर येताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

या नाव मध्ये नाविकासह एकूण १० जण बसले होते. नाव उलटताच नाविक प्रदीप पोहून किनाऱ्यावर आला. मात्र, इतर नागरिक हे बुडाले. हे सर्व नागरिक गिरिडीह परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. पंचखेरो डॅम हा झारखंडमधील कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्याच्या सीमाभागात आहे.

एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण १० नागरिक बुडाले आहेत. या १० नागरिकांपैकी सात जण हे एकाच कुटुंबातील असल्याचं वृत्त समोर येत आहे. जे १० नागरिक बुडाले आहेत त्यामध्ये पाच लहान मुले, दोन महिला आणि दोन पुरुष नागरिक होते. हे सर्व नागरिक गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार प्रखंड येथील असल्याची माहिती समोर येत आहे. डॅममध्ये नाव उलटल्याचं वृत्त समोर येताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

हे पण वाचा: टॉयलटमध्ये दिसला साप, काढला फणा

पर्यटकांची गर्दी 

पंचखेरो डॅम हे खूपच प्रेक्षनिय स्थळ आहे. या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत असते. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि आसपासचे निवासी येथे फिरण्यासाठी, पर्यटनासाठी येत असतात. पाच वर्षांपूर्वीच या डॅमची निर्मिती करण्यात आली आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मदत-बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी मरकच्चो सीईओ राम सुमन प्रसाद हे सुद्धा दाखल झाले आहेत.

फेब्रुवारीतही दुर्घटना

यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी जामताडा येथे अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली होती. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला होता. जामताडा येथील बिरगाव बराकर नदीमध्ये आलेल्या वादळामुळे नाव अनियंत्रित झाली आणि उलटली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता तर चार जणांनी पोहून किनारा गाठत आपला जीव वाचवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी