मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ११ खासदार आणि अमित शहांची दिल्लीत भेटीची चर्चा; काय घडलं नेमकं? वाचा

Shiv Sena MP meeting with Amit Shah: महाराष्ट्रात सत्तांतर झाले असतानाच आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

big breaking Eknath Shinde and Shiv Sena 11 MP meet Amit Shah said sources know what happened in meeting
मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ११ खासदार आणि अमित शहांची दिल्लीत भेटीची चर्चा; काय घडलं नेमकं? वाचा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या ११ खासदार आणि अमित शहांची दिल्लीत भेट? 
  • शुक्रवारी संध्याकाळी अमित शहांसोबत चर्चा 
  • अमित शहा आणि शिवसेना खासदारांमध्ये तब्बल साडेपाच तास चर्चा 

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा झटका ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांचा सूर हा शिंदे गटासोबत जुळवून घेण्याचा असल्याचं दिसून येत आहे. असे असतानाच आता दिल्ली (Delhi)तून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट (Shiv Sena MP's meeting with Amit Shah) घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीवेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत उपस्थित होते. तर त्याच भेटीदरम्यान शिवसेनेचे ११ खासदार सुद्धा उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार आणि अमित शहा यांच्यात जवळपास साडेपाच तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे. 

शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला हे खासदार मतदान करणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या या गटाला एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल तर काय करायला हवं या संदर्भात व्यहरचना ठरली असल्याचं बोललं जात आहे.

हे पण वाचा : पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचे; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

इतकंच नाही तर १२ ते १३ खासदारांच्या आमच्या गटाला स्वतंत्रपणे मान्यता द्या अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांचा गट लोकसभेच्या सभापतींकडे करू शकतो. ही मागणी १३ किंवा १४ जुलै दरम्यान केली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली होती.

पुढील रणनिती ठरली?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जे खासदार विजयी झाले होते ते नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे आले होते. त्यामुळे अनेक खासदारांचं म्हणणं आहे की, २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा विजयी व्हायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याची आवश्यकता भासेल आणि त्यामुळे पुढे कशा प्रकारची व्यहरचना असावी याबाबतही चर्चा झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी