Election Commission grants National party status to AAP and withdrawn status of NCP: एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही तर केवळ प्रादेशिक पक्ष असणार आहे.
WHAT CONSTITUTES A NATIONAL PARTY? — Mirror Now (@MirrorNow) April 10, 2023
- party must secure at the least 6% votes in Lok Sabha or 4 LS seats
OR
- win 2% in LS from at the least 3 states
OR
- recognition as state party in 4 states#NationalParty #AamAadmiParty #TMC pic.twitter.com/HrbatEO9db
हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याच्या संदर्भात काही निकष आहेत. त्यानुसार किमान चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभा निडणुकीत तीन किंवा त्याहून अधिक राज्यांत किमान दोन टक्के मते पक्षाला असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यास काही सवलती मिळतात. त्यामध्ये संपूर्ण देशभरात एकच चिन्ह मिळतं, नवी दिल्लीत कार्यालयासाठी जागा मिळते. निवडणुकीत सार्वजनिक वाहिन्यांमध्ये पब्लिक ब्रॉडकास्टिंगसाठी वेळ सुद्धा मिळतो. मात्र, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यावर आता पक्ष या सर्वांसाठी अपात्र ठरतो.
हे पण वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची योग्य पद्धत माहितीये का?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (10 एप्रिल 2023) केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केलेला नाहीये तर तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा 10 जानेवारी 2000 रोजी मिळाला होता. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळापर्यंत हा दर्जा कायम होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भातील नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, नागालँड या ठिकाणचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व कमी होत गेलं. काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा होता तो सुद्धा रद्द झाला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेत 16 टक्के मते मिळाली होती तर 288 जागांपैकी 54 जागा जिंकल्या होत्या. मात्र, इतर राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स हा कमी होत गेला असल्याचंही निवडणूक आयोगाने नमूद केलं आहे.