Plane Crash in Madhya Pradesh and Rajasthan: एक मोठी दुर्घटना घडली आहे. एकाचवेळी तीन विमान कोसळल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशात लष्कराचे दोन विमान कोसळले आहेत तर राजस्थानमध्येही एक चार्टर्ड विमानाचा अपघात झाला आहे. शनिवारी (28 जानेवारी 2023) सकाळच्या सुमारास मध्यप्रदेशातील मुरेना येथे एक सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज 2000 (Mirage 2000) ही दोन विमाने कोसळल्याची घटना समोर आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखोई 30 मध्ये दोन वैमानिक होते तर मिराज 2000 विमानात एक वैमानिक होता. दोन्ही फायटर जेट हवेत एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला की इतर कारणामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वैमानिक सुरक्षित असून घटनास्थळावर बचाव आणि मदतकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे.
हे पण वाचा : अशा मुलांवर मुली सहज होतात घायाळ
“Raksha Mantri Shri Rajnath Singh was briefed by the Chief of Air Staff on the crash of two aircraft of the Indian Air Force. Raksha Mantri enquired about the well-being of the IAF pilots and is monitoring the developments closely,” Defence Ministry sources say — ANI (@ANI) January 28, 2023
तर तिकडे राजस्थानमधील भरतपूर येथे एक चार्टर्ड विमान कोसळलं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर बचाव आणि मदतकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले.
हे पण वाचा : या सक्सेस मंत्राने महिलांना अगदी सहज मिळेल यश
Received info about a plane crash around 10-10.15 am. After coming here, it was found it was an IAF fighter jet. Going by the debris, we're unable to adjudge if it's a fighter plane or a regular plane. Yet to know if pilots got out or are still in: Bharatpur DSP at Bharatpur, Raj pic.twitter.com/W9BupSKU8B — ANI (@ANI) January 28, 2023
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुखोई-30 आणि मिराज 2000 या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेस येथून उड्डाण केले होते. या दोन्ही विमानांचा सराव सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.
हे पण वाचा : या टिप्स वापरा अन् मुलांच्या मनातून रात्रीची भीती करा दूर
राजस्थानमधील भरतपूर येथे एक छोटे विमान कोसळले आहे. तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.