केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गौतम अदानींना Z प्लस सुरक्षा

Gautam Adani Security: मुकेश अंबानी यांना 2013 मध्ये झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने गौतम अदानी यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

big decision of modi government z plus security to gautam adani
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गौतम अदानींना Z प्लस सुरक्षा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
  • या तेजीमुळे अदानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होण्याचा मान मिळाला आहे.
  • नीता अंबानी यांना 2016 मध्ये 'Y' श्रेणी CRPF सुरक्षा देण्यात आली होती.

नवी दिल्ली. इंटेलिजन्स ब्युरोने (IB) पाठवलेल्या अहवालाच्या आधारे केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अदानी यांना 'झेड प्लस' (Z Plus) सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या धमकीच्या आधारे गौतम अदानी यांना सरकारने उच्चस्तरीय सुरक्षा पुरवली आहे. (big decision of modi government z plus security to gautam adani)

कोण उचलणार खर्च?

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपच्या चेअरमन असलेले गौतम अदानी यांना जी झेड श्रेणीच्या सुरक्षेचा पुरविण्यात येणार आहे त्याचा खर्च ते स्वत:च उचलणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या उद्योगपतीला देण्यात आलेल्या सुरक्षेत लष्कराचे ३० हून अधिक जवान तैनात करण्यात येणार आहेत. सशस्त्र दले त्यांना हे संरक्षण देतील.

अधिक वाचा: दहा दिवसांत केंद्र सरकारला मिळणार १३५०० कोटी रुपये

अंबानींची सुरक्षा

याआधी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना गृह मंत्रालयाकडून 'झेड' सुरक्षाही देण्यात आली आहे, ज्याचा खर्च ते उचलत आहेत. जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुंबईत अंबानींना दिलेले सुरक्षा कव्हर सुरू ठेवण्याची परवानगी दिली. केंद्राने दिलेल्या सुरक्षेसाठी अंबानी कुटुंब पैसे देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गौतम अदानींची किती आहे संपत्ती?

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे $126 अब्ज संपत्तीसह जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे 91.9 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते जगातील 11 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे.

अधिक वाचा: टिकटॉक आणि यूट्यूबमुळे Facebook तोट्यात?, सीईओ मार्क झुकरबर्गने गमावली अर्धी संपत्ती, घरही विकले

अदानी समूह ऊर्जेमध्ये $70 अब्ज गुंतवणूक करणार

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी काही दिवसांपूर्वीच वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले होते. गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे. त्यावेळी ते असं म्हणाले होते की, 'भारताच्या विकास दरावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, भारताच्या विकासाच्या गतीशी बरोबरी करणारा दुसरा कोणताही देश नाही. गौतम अदानी म्हणाले की, सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू आयात करणारा देश आहे, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की, लवकरच भारत जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनेल.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी