या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आजपासून प्रत्येक घराला प्रति महिना 300 युनिट वीज मोफत

Free Electricity of 300 units: आजपासून 300 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीनंतर हा निर्णय घेणारा पंजाब हे दुसरं राज्य बनलं आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक घराला 300 युनिट प्रति महिना वीज मोफत 
  • दिल्लीनंतर पंजाब सरकारने करुन दाखवलं
  • आजपासून पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत सुरू

Free Electricity: महाराष्ट्रात सत्ता संघर्षानंतर सत्तांतर झांल. राज्यात नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले. या सत्तांतरापूर्वी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांनी सुरत आणि गुवाहाटी येथे आठ दिवस वास्तव्य केलं. त्यानंतर मविआ सरकार कोसळलं. या सर्वांत महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचं काय? त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांचं काय? प्रलंबित कामे कशी आणि कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते. तर तिकडे लहान राज्य असलेल्या पंजाबमधील नव्या सरकारने एक मोठा निर्णय जाहीर करत त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू केली. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं, त्याचे सरकार राज्यातील जनतेला दिलेली हमी पूर्ण करत आहे. शुक्रवारपासून म्हणजेच 1 जुलै पासून प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार (300 units electricity free) आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वी 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. ते आश्वासन पूर्ण करत आहोत. म्हणजेच आजपासून सर्व नागरिकांना 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे म्हणजे इतक्या वापरासाठी नागरिकांना वीज बिल द्यावे लागणार नाही. यासोबतच 31 डिसेंबर 2021 पूर्वीची सर्व वीज बिल माफ केली जातील.

मुख्यमंत्री भगवंत मान पुढे म्हणाले, यापूर्वीची सरकारे निवडणुकीपूर्वी आपल्या घोषणापत्रात अनेक आश्वासने देत होतं. पण ती आश्वासनं त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काही पूर्ण होत नव्हती. पण आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात एक नवीन उदाहरण ठेवलं आहे. आम्ही आजपासून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आहोत.

हे पण वाचा : आजपासून देशात 5 नवीन नियम लागू, तुमच्यावर होणार थेट परिणाम!

राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी म्हटलं, नागरिकांना वीज मोफत देणारं पंजाब हे राज्य देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने असा निर्णय घेतला आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 

पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी 27 जून रोजी आम आदमी पक्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की, राज्यातील नागरिकांना 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करुन देऊ. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर 1,800 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी