कोरोना व्हायरसबाबत एक अत्यंत मोठी बातमी 

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहे. पण दिलासा देणारी बाब अशी आहे की या व्हायरसचा संसर्ग हा सरसकट झालेला नाही.

big news amidst threat of coronavirus no evidence of infection spreading in india
कोरोना व्हायरसबाबत एक अत्यंत मोठी बातमी (फोटो सौजन्य:Pixabay)  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. भारतादेखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. परंतु काहीशी समाधानाची बाब म्हणजे १३० कोटी लोकसंख्येमध्ये आतापर्यंत एकूण १७५ जणांना याची लागण झाली आहे. ज्यापैकी १५ जणांवर उपचार करुन त्यांना घरी देखील सोडण्यात आलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. जे एकूण प्रकरणांपैकी केवळ दोन टक्के आहे. एकूण १५७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ICMR ने  दिली महत्त्वाची माहिती 

भारतीय मेडिकल कौन्सिल रिसर्चने दावा केला आहे की, भारतातील लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही. हा व्हायरस सगळीकडे सरसकट पसरलेला नाही. तो  काही लोकांपुरताच मर्यादित आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यामुळे संपूर्ण परिसरात हा व्हायरस पसरेल. हा व्हायरस हवेतून पसरत नाही. दोन व्यक्ती संपर्कात आल्यानंतर त्याचा संसर्ग होतो. 

देशाच्या विविध भागात आणि शहरात करण्यात आली रुग्णांची नोंद

हे खरे आहे की, भारतात कोरोनाचे एक-एक रुग्ण समोर येत आहेत. परंतु चांगली गोष्ट ही आहे की, एकाच ठिकाणी रुग्णांना संसर्ग झालेला नाही. . भारतातील जवळजवळ ६१ टक्के रुग्ण हे परदेशातून आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जे इतर ३९ टक्के लोक हे कोरोना बाधित झाले आहेत ते वरील ६१ टक्के रुग्णांच्या संपर्कात आल्याने.  ज्यासाठी आतापर्यंत सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. एकूण १७५ रुग्णांपैकी ८२ रुग्ण हे भारतीय आणि २८ रुग्ण परदेशी आहेत.

१००० नमुन्यांची तपासणी करण्यात आली

देशभरातून सुमारे १००० नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीत ही माहिती समोर आली की,  देशात कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान, अशा लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत की, जे परदेशात गेलेले नव्हते किंवा परदेशात गेलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नव्हते. या सर्व नमुन्यांची तपासणी केल्यावर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, भारतात कोरानाने भयानक रुप धारण केलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की, कोरोनाचा संसर्ग सहज प्रसार होण्याचा धोका कमी आहे.

दर आठवड्यात नमुने घेतले जाणार 

देशातील ५२ प्रयोगशाळांमध्ये एकूण १००० नमुने घेण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रयोगशाळेतून सुमारे २० नमुने घेण्यात आले. हे त्या लोकांचे नमुने आहेत ज्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. या लोकांनी परदेश प्रवास केलेला नाही. १७ मार्च रोजी प्रारंभिक ५०० नमुन्यांची चाचणी ही निगेटिव्ह आली.  आयसीएमआरद्वारे दर आठवड्याला असेच नमुने गोळा केले जातील आणि त्या आधारे पुढील रणनिती ठरवली जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी