मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोडला काँग्रेसचा हात; नव्या पक्षाची घोषणा, भाजपशी होणार 'या' शर्तीवर युती

पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Big news! Capt Amarinder Singh launch new political party
कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • नव्या पक्षाची भूमिका आणि तसेच नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
  • सिंग यांचा नवा पक्ष पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण जागा लढवणार.
  • शेतकरी आंदोलनावर भाजपने तोडगा काढला तर भाजपशी युती करण्यास कॅप्टन तयार.

चंदीगड : पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसचा हात सोडताना त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा करत जोरदार झटकादेखील दिला. 
नव्या पक्षाची भूमिका आणि तसेच नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सिंग यांचा नवा पक्ष पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत. 

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी मंगळवारी अनुक्रमे ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या हवाल्यानं लिहिलं की, पंजाब आणि त्या लोकांसाठी ज्यात शेतकऱ्यांचाही समावेश आहे त्यांच्या चांगल्यासाठी लवकरच माझा नवीन राजकीय पक्ष स्थापन करेन. 

भाजपशी युती करण्याची शक्यता 

अमरिंदर सिंग यांच्या या भूमिकेमुळे पंजाबच्या राजकारणात नवी समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीमाना देण्याचे आदेश दिले. तसेच चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला. याच कारणामुळे मागील अनेक दिवसांपासून अमरिंदर सिंग नाराज होते.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी आता भापजमध्ये थेट प्रवेश न करता नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच पक्षस्थापनेनंतर ते भाजपशी युती करण्याची शक्यता करतील असे सांगितले जात आहे. 

या शर्तीवर होणार भाजपशी युती 

कॅप्टन यांनी स्थापन केलेल्या पक्षाची भूमिका काय असेल तसेच पक्षाचे नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी यांनी याची माहिती देताना भाजपशी युती कोणत्या आधारावर केली जाईल याची कल्पनाही दिली आहे. आपल्या ट्विट मध्ये लिहितांना ठुकराल यांनी म्हटलंय की, "शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार असेल तर नव्या पक्षासह मी भाजपशी युती करेन आणि 2022 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत जागावाटपाच्या करारावर चर्चा करेन. तसेच समविचारी पक्ष जसे अकाली गट, विशेषत: भिंडसा आणि ब्रह्मपुरा गटासोबत युतीचाही मी विचार करत आहे.

मी माझ्या लोकांचे आणि माझ्या राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही. पंजाबला राजकीय स्थिरता आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण आवश्यक आहे, असं ट्विटही पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट केले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपने तोडगा काढला तरच भाजपशी युती करू असं स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे कॅप्टन नाराज 

दरम्यान, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसवर तसेच काँग्रेस नेतृत्वार प्रचंड नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी यापूर्वी उघडपणे बोलून दाखवलेली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचे जे धोरण राहिले आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अपमानित झाल्यासारखे वाटते, असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख जाहीरपणे बोलून दाखवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी