भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार

Big news on corona vaccination, precautionary dose for 18+ will be available at private centers from 10th April 2022 : भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार आहे. देशातील अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक हा डोस घेऊ शकतील.

Big news on corona vaccination, precautionary dose for 18+ will be available at private centers from 10th April 2022
भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार 
थोडं पण कामाचं
  • भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार
  • बूस्टर डोस हा ऐच्छिक आहे आणि खासगी हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने घेता येणार आहे
  • लसचा दुसरा डोस घेऊन किमान नऊ महिने पूर्ण झाले असतील तरच बूस्टर डोस घेता येणार

Big news on corona vaccination, precautionary dose for 18+ will be available at private centers from 10th April 2022 : नवी दिल्ली : भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार आहे. देशातील अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक हा डोस घेऊ शकतील. कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस ६०० रुपये एवढ्या रकमेत खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे.

लसचा दुसरा डोस घेऊन किमान नऊ महिने पूर्ण झाले असतील तरच बूस्टर डोस घेता येणार आहे. बूस्टर डोस हा ऐच्छिक आहे आणि खासगी हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने घेता येणार आहे. याआधी देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक यांना खबरदारीचा उपाय म्हणून लसचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस देण्यात आला. हा डोस सरकारी आरोग्य केंद्र, सरकारी हॉस्पिटल येथे विनामूल्य उपलब्ध होता. 

आतापर्यंत भारतातील १५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ९६ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस टोचण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक या गटातील २ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. देशातील १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के नागरिकांना लसचा पहिला डोस टोचण्यात आला आहे. 

कोविन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ८५ कोटी ४३ लाख ४९ हजार ३५४ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले आहेत. यात ९९ कोटी ४२ लाख ६ हजार ५७४ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस टोचण्यात आला आहे. देशातील ८३ कोटी ७२ लाख ७९ हजार १९२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस टोचण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक गटातील २ कोटी २८ लाख ६३ हजार ५८८ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा तिसरा अर्थात खबरदारीचा डोस (बूस्टर डोस) देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी