मोठी बातमीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान मोदींनी एक आश्चर्यकारक ट्विट केलं आहे.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' सर्वात मोठा निर्णय 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान मोदींनी एक आश्चर्यकारक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे असे त्यांनी लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मोदींच्या ट्विटनं ट्विटरवर भूकंप झाला आहे. या विषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे.

पंतप्रधान मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन. 

मोदींचे ट्विटरवर 53.3 मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 44, 597, 317 म्हणजेच  4 कोटी 45 लाख जण त्यांना फॉलो करतात. तर इंस्टाग्रामवर त्यांचे 35.2 मिलिअन फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणारे नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.तर ते स्वत: 2 हजार 373 जणांना फॉलो करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली. सोशल मीडियाद्वारे मोदींना मिळालेली प्रसिद्ध आणि यश पाहून अनेक नेत्यांनी स्वत: चे सोशल मीडिया अकाऊंट बनवले होते.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना टोला

 पंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट शेअर करत राहुल गांधी म्हणाले, द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही. राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी